बिरोबा पतसंस्थेची ३४ वी वार्षिक सभाउत्साहात

दिवाळी भेटवस्तू सह सभासदांना मिळणार १४ टक्के लाभांश

नारायणगाव (किरण वाजगे कार्यकारी संपादक)
वडगाव कांदळी (ता. जुन्नर) येथील श्री. बिरोबा महाराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन सचिन निलख यांच्या अध्यक्षतेखाली आज उत्साहात पार पडली. सभेच्या विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात आली. यावेळी व्हा. चेअरमन देवीदास भोर, संचालक ज्ञानेश्वर थोरात, विश्वनाथ पवार, चंद्रकांत काळे पाचपुते, पंढरीनाथ पाचपुते, संतोष लांडगे, डॉ. निजाम पठाण, एड. राहुल फुलसुंदर, अविनाश पवार, रवींद्र रोकडे, संचालिका अंजना नरवडे, मनीषा सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार मुटके, संगणक ऑपरेटर अजित रोकडे, अंतर्गत हिशोब तपासणीस बबन भालेराव, मदतनीस रमेश पाचपुते यांच्यासह सभासद व मान्यवर उपस्थित होते. बिरोबा महाराज देवस्थान ट्रस्टचे सचिव बबन पाचपुते, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक व वडगाव कांदळीचे उपसरपंच संजय खेडकर, निवृत्त आदर्श मुख्याध्यापक भास्कर पाचपुते, पोलीस पाटील बाळासाहेब पाचपुते, माजी आदर्श सरपंच ज्ञानेश्वर निलख, बिरोबा महाराज दूध संस्थेचे चेअरमन संदेश पाचपुते, मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते शाबुद्दीन इनामदार, लोकनेते पतसंस्थेचे संचालक संतोष काळे, कांदळी गावचे खंडू गुंजाळ उपस्थित होते.
यावेळी सभासद डॉ. सत्यवान थोरात यांनी अनेक मार्गदर्शनपर सूचना केल्या. गोरक्ष मुटके, बाबाजी लांडगे, संदीप निलख, पोपट निलख या सर्व सभासदांनी खेळीमेळीच्या वातावरणात चर्चेत सहभाग घेतला.
संस्थेचे कार्यक्षेत्र जुन्नर तालुका करावे, सभासदांना ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, संस्थेची वसुली वाढवावी अशा प्रकारच्या अनेक सूचना सभासदांनी केल्या. यावेळी विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या सभासदांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला.
चौतीस वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या बिरोबा महाराज पतसंस्थेमध्ये १४३४ सभासद असून १३ कोटी ३२ लाखाच्या ठेवी आहेत. संस्थेने ४ कोटी ७० लाख ९५ हजार रुपयेची गुंतवणूक केलेली आहे. स्वनिधी १ कोटी ७५ लाखाचा असून संस्था पूर्णपणे स्थिर स्थावर आहे. संस्थेने कोणत्याही बँकेचे कर्ज घेतलेले नाही. संस्थेला या आर्थिक वर्षात ३५ लाखांचा निव्वळ नफा झालेला आहे. दरवर्षी संस्था १४ टक्के लाभांश आणि दिवाळी भेटवस्तू देते, अशी माहिती चेअरमन सचिन निलख यांनी दिली.
संस्थेतर्फे सभासदांना आरटीजीएस, एनइएफटी, गृहतारण कर्ज, वाहनतारण कर्ज, जामीनकी कर्ज या सर्व सुविधा पुरविण्यात येत आहेत. मोबाईल बँकिंग आणि एसएमएस सुविधाचे कामसुद्धा अंतिम टप्प्यात असून थोड्याच अवधीत या सुविधा सभासदांना उपलब्ध केल्या जातील.
सभेचे सूत्रसंचालन आणि अहवाल वाचन अंतर्गत हिशोब तपासणीस बबन भालेराव यांनी केले. आभार संचालक एड. राहुल फुलसुंदर यांनी मानले.