आपला आवाज,आपला गणपती च्या आरतीला मान्य़वरांची उपस्थिती

माजी महापौर,स्थायी चे माजी चेअरमन,भाजपा शहर अध्यक्ष तसेच माजी नगरसेवकांच्या हस्ते संपन्न झाली आपला आवाज न्यूज नेटवर्क च्या बाप्पाची आरती

प्रतिनिधी
पिंपरीःआपला आवाज,आपला गणपती च्या सकाळ आणि संध्याकाळच्या आरतीला गुरुवारी (ता.२८) शहरातील मान्यवरांनी उपस्थिती लावली.सकाळची आरती माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केली. तर,सायंकाळी ती माजी महापौर भाजपचे नितीन काळजे यांच्या हस्ते झाली.

सकाळी बहल यांच्यासह स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे,माजी नगरसेवक शाम लांडे आणि माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी पिंपरीतील आपल्या आवाज न्यूज नेटवर्क च्या कार्यालयातील गणरायाची आरती केली. यावेळी हा मान दिल्याबद्दल आपला आवाज चे त्यांनी आभार मानले.तसेच शहरातील नागरिकांना गणेशोत्वाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी आपला आवाज चे मुख्य संपादक डॉ.अतुल परदेशी,संपादक उत्तम कुटे,विभागीय संपादिका संगीता तरडे व सहकारी उपस्थित होते.

सायंकाळी शहराचे दुसरे माजी महापौर भाजपचे नितीन काळजे तसेच या पक्षाचे शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक शत्रूघ्न ऊर्फ बापू काटे आणि त्यांच्या काल जाहीर झालेल्या नव्या कार्यकारिणीने आपला आवाज च्या गणपतीची आरती केली. त्यांचे स्वागत डॉ. अतुल परदेशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.यावेळी काटे यांच्या सोबत मावळते वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मुख्य प्रवक्ते राजू दुर्गे,नव्या कार्यकारिणीतील संघटक सरचिटणीस अॅड. मोरेश्वर शेडगे,सरचिटणीस मधुकर बच्चे,वैशाली खाडे,भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दिनेश यादव तसेच कैलास सानप,मनोज ब्राम्हणकर, राजू मासूळकर शिवराज लांडगे,कुणााल लांडगे,विठ्ठल भोईर,नंदू भोगले आदी उपस्थित होते.गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी जाहीर केलेल्या आपल्या कार्यकारिणीला लगेच दुसऱ्या दिवशी बाप्पाच्या आरतीचा मान दिल्याबद्दल काटे यांनी आपला आवाज चे आभार मानले. नवी कार्यकारिणी बाप्पाचा आशिर्वाद घेण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले.शहरवासियांना त्यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. काळजे यांनी सुद्धा आरतीचा मान दिल्याबद्दल आपला आवाज चे आभार मानत सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

चौकट
माजी महापौर योगेश बहल माजी महापौर नितीन काळजे माजी चेअरम अतुल शितोळे शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे माजी नगरसेवक शामराव लांडे व जितेंद्र ननावरे यांच्या हस्ते संपन्न झाली आपला आवाज न्यूज नेटवर्क च्या बाप्पाची आरती