पिं.चि.भाजप शहराध्यक्ष शत्रूघ्न काटे यांनी कार्यकारिणीसाठी निवडला गणेश चतुर्थीचा मुहूर्त

वरिष्ठ उपाध्यक्ष काळूराम बारणे,महिला अध्यक्ष सुजाता पालांडे, तर युवा मोर्चा अध्यक्षपदी दिनेश यादव

उत्तम कुटे
पिंपरीःभाजपचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष शत्रूघ्न ऊर्फ बापू काटे यांनी आपली सव्वाशेजणांची टीम तथा कार्यकारिणी बुधवारी (ता.२७) जाहीर करताना गणेश चतुर्थी म्हणजे गणपती विराजमान झाल्याचा मुहूर्त साधला.,संघटन सरचिटणीसपदी अॅ़डच. मोरेश्वर शेडगे,वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून काळूराम बारणे,महिला शहराध्यक्षपदी सुजाता पालांडे,तर युवा मोर्चा शहराध्यक्षपदी दिनेश यादव यांची नेमणूक केली.आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नवी कार्यकारिणी हा पक्षाला बूस्टर डोस समजला जात आहे.त्यातून त्यांच्या सत्ता राखण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

mostbet

कार्यकारिणीतील नावे पाहता कामे केलेल्यांना संधी दिल्याचे दिसून आले आहे.तसेच ती सर्वसमावेशक अशी असल्याने त्यावरून नाराजी होण्याची शक्यता दिसत नाही.महिलांनाही त्यात पुरेसे प्रतिनिधीत्व देण्यात आलेले नाही.नव्या कार्यकारिणीत एक संघटन सरचिटणीस, तीन सरचिटणीस,आठ वरिष्ठ उपाध्यक्ष,तेवढेच सचिव आहेत.

गेल्या टर्मपासून तयार करण्यात आलेले संघटन सरचिटणीस हे अध्यक्षानंतरचे पद हे अॅड मोरेश्वर शेडगे यांना देण्यात आले आहे.तर सरचिटणीस म्हणून विकास डोळस,मधुकर बच्चे आणि वैशाली खाड़े यांना संधी दिली गेली आहे.वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून काळूराम बारणे,अॅड.विनायक गायकवाड,तुषार हिंगे,राम वाकडकर, अमित परसणीकर,रमेश वहिले,अजित भालेराव आणि विनोद मालू यांना जबाबदारी देण्यात आली आहे.विविध सेलच्या अध्यक्षांचाही यात समावेश आहे.

कार्यकारिणी जाहीर करताना सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे काटे यांनी सांगितले.त्या सर्वांना न्याय देण्याची इच्छा होती,परंतू पदाची मर्यादित संख्या पाहता ते शक्य झाले नाही,अशी खंत त्यांनी व्यक्त केली.मात्र,पक्षासाठी योगदान देणाऱा एकही कार्यकर्ता पदापासून वंचित राहणार नाही,असा शब्दही त्यांनी दिला.

कार्यकर्त्याची क्षमता आणि योगदान पाहून त्यांना पद दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.त्यासाठी त्यांनी तीनशेपेक्षा जास्त इच्छूकांच्या मुलाखती शहर पक्ष कार्यालयात घेतल्या होत्या.
तसेच त्यासाठी त्यांना पक्षाच्या राज्य व शहर पातळीवरील नेत्यांचे सहकार्य मिळाले.

इतर काही नियुक्त्या अशा ः

महिला मोर्चा अध्यक्षा ः सुजाता पालांडे
युवा मोर्चा अध्यक्ष ः दिनेश यादव
कोषाध्यक्ष ः हेमचंद्र मासूळकर
कार्यालय प्रमुख ः संजय परळीकर


अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष ः अनिल ऊर्फ बापू घोलप
ओबीसी मोर्चा अध्यक्ष ः चेतन भुजबळ
सहकार आघाडी ः सुनील कुंजीर
व्यापारी आघाडी अध्यक्ष ः राजेंद्र चिंचवडे


कायदा आघाडी अध्यक्ष ःअॅड. गोरख कुंभार
सोशल मिडिया सेल अध्यक्ष ः सागर बिरारी
ट्रान्सपोर्ट सेल अध्यक्ष ः सुनिल लांडगे
सांस्कृतिक सेल अध्यक्षः विजय भिसे


ज्येष्ठ कार्यकर्ता सेल ः विजय सिनकर
माजी सैनिक सेल ःदेविदास साबळे
मन की बात संयोजक ः नंदकुमार दाभाडे
दिव्य़ांग सेल ःअंकुश शिर्के


आयुष्मान भारत सेल ःगोपाळ माळेकर
चार्टर्ड अकाउंट सेलः बबन डांगले