१४ व २६ वर्षाच्या मुलांची आई असणाऱ्या ठग महिलेने लग्न करून सात जणांना फसवले

 

खोडद येथील तरुणाशी लग्न करून फसवल्या प्रकरणी ८ आरोपींना बेड्या

नारायणगाव :- (किरण वाजगे/ प्रतिनिधी)
खोडद तालुका जुन्नर येथील शरद तुकाराम गायकवाड यांच्याबरोबर काही दिवसांपूर्वी लग्न करून त्याची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी अश्विनी सागर जगदाळे (रा. पर्वती दर्शन, स्वारगेट, पुणे) या विवाहित महिलेसह आठ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या महिलेला १४ व १६ वर्षाची दोन मुले आहेत. अशी माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.
याबाबत माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्यातील काही आरोपी तसेच पुणे, संभाजीनगर, अहिल्यानगर येथील आरोपींच्या मदतीने नारायणगाव जुन्नर, पारनेर, ओतूर या पोलीस स्टेशन हद्दीमधील सुमारे सहा ते सात तरुणांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये घेऊन पोबारा केला असल्याचे उघडकीस आले आहे.
याप्रकरणी गुन्ह्यातील आरोपी १)सुवर्णमाला सुरेश वाडकर रा. छत्रपती संभाजी नगर,
२) मनीषा अडसुळे रा. सिंहगड रोड पुणे
३) संतोष सखाराम घोडे रा. पिंपळनेर पावर हाऊ जवळ जालना रोड, ता. देऊळगाव जि. बुलढाणा
४)भारती दामोदर मोरे रा. डोणगाव इंदिरानगर तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा
५) अश्विनी सागर जगदाळे रा. १६५/ पी पर्वती दर्शन स्वारगेट पुणे,
६) सुनील काळे रा. पंचतळे, शिरूर
७) पंकज डग रा. पंचतळे, शिरूर
८) नामदेव कोल्हे रा, जांबुत, ता. पारनेर जि. अहिल्यानगर
या आरोपींना त्यांचे बुलढाणा जिल्ह्यातील मूळ गावी जाऊन ताब्यात घेतले आहे. येथील एका आरोपीला ताब्यात घेणे बाकी आहे.
दरम्यान आरोपी व बनावट वधू अश्विनी हिने आणखी काही तरुणांना फसवले असण्याची शक्यता पाहता पोलीस तपास करीत आहेत. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यातील ४ जणांना न्यायालयीन कोठडी तर ३ जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जगदेव आप्पा पाटील पुढील तपास करीत आहेत