शिरूरला वाढत्या चोऱ्यांबाबत DYSP ढोले यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसुरक्षा दलासंदर्भात बैठक संपन्न

बातमी : रवींद्र खुडे, विभागीय संपादक
पुणे जिल्ह्यातील शिरूर पोलीस स्टेशन येथे, शिरूरचे ऊपविभागीय पोलिस अधिकारी (DYSP) प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या उपस्थितीत, सोमवार दिनांक 07/07/2025 रोजी, शिरूर पोलीस स्टेशन हद्दीमधील पोलीस पाटील सरपंच उपसरपंच, ग्रामस्थ व पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
या बैठकीत चोरींच्या घटनांना आळा बसविण्याकरिता ग्राम सुरक्षा यंत्रणा, ग्राम सुरक्षा दल, तसेच गावामध्ये सीसीटीव्ही बसवीणे आदी विषयांबाबत चर्चा करण्यात आली.
सदर मीटिंगमध्ये खालील प्रमाणे मार्गदर्शन तसेच सूचना देण्यात आल्या.


1) प्रत्येक गावामध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी. सदर यंत्रणेचे कार्य व त्यामधून चोरींच्या घटनांना कसा आळा बसतो. याबाबत मार्गदर्शन करून सदर यंत्रणा गाव पातळीवर पोलीस पाटील, सरपंच व ग्रामस्थ यांनी समन्वयाने चालू करून घ्यावी.
2) प्रत्येक गावामध्ये ग्राम सुरक्षा दल असून ते ग्राम सुरक्षा दल पुनर्जीवित करून, रोज रात्री गावामध्ये टप्प्याटप्प्याने रात्रग्रस्त घालणे.
3) गावचे मुख्य रस्ते, प्रवेशद्वारे, बाजारपेठा, शाळा व संवेदनशील ठिकाणी CCTV कॅमेरे बसविण्याबाबत ग्राम स्तरावर उपाययोजना करण्यात याव्यात.
4) गावामध्ये वाढत चाललेल्या चोरीच्या घटनांच्या अनुषंगाने, ग्राम सुरक्षा दल व ग्रामसुरक्षा यंत्रणेला अधिक सक्षम करणे, तसेच गावांमध्ये CCTV बसविणेबाबत योग्य नियोजन व अंमलबजावणी करणे.
आदी विषयांवर उपस्थितांची मते घेत, याबाबत मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्यात.