मस्करीतून मित्राला चापट्या मारण्याचा जाब विचारणे बेतले एकाच्या जीवावर,अल्पवयीनाने कात्रीने केले वार
उत्तम कुटे
पिंपरीःपिंपरी-चिंचवडसह राज्यातील वाढत्या बालगुन्हेगारीबद्दल चिंता व्यक्त करीत त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी शहरातीलआमदार अमित गोरखे यांनी काल (ता.४) राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानपरिषदेत केली होती.या गंभीर आणि ज्वलंत प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधत बाल न्याय कायद्यातील पळवाटा बंद करण्याचा आग्रहही धरला होता.नेमका कालच उद्योगनगरीत आणखी एका बालगुन्हेगाराविरुद्ध खूनाच्या प्रय़त्नाचा गुन्हा दाखल झाला.त्यातून आ. गोरखेंनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला दुजोरा मिळाला.
शहरात गेल्या महिन्यात झालेल्या खूनात अल्पवयीनांचा सहभाग आढळून आला आहे.त्याजोडीने खूनी हल्यासारख्या गुन्ह्यांत ते सामील असल्याचे दिसून आले.या वाढत्या बालगुन्हेगारीमुळे त्यांचे वय १८ वरून १६ करण्याच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे.त्यासाठी कायद्यात दुरुस्ती करावी लागणार असून परंतू, त्याविषयी सरकार गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले आहे.अन्यथा एव्हाना त्यांनी त्यादृष्टीने खासगी पावले उचलली असती.दुरुस्ती विधेयक आणले असते.परंतू, तसे न झाल्यानेच आ.गोरखे यांना काल याप्रश्नी लक्षवेधी मांडावी लागली.त्यानंतरही बालगुन्हेगारी सुरुच राहिली असून ती पोलिसांची मोठी डोकेदुखी ठरते आहे.
दरम्यान,वाकड पोलिस ठाण्यावर काल दाखल झालेल्या खूनी हल्यातील बालगुन्हेगाराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आल्याचे तपासाधिकारी युवराज बनसोडे यांनी थोड्या वेळापूर्वी आपला आवाज ला सांगितले.तसेच या अल्पवयीन हल्लेखोराने कात्रीने केलेल्या हल्यात गंभीर जखमी झालेला फिर्यादी विष्णू विठ्ठल गायकवाड (वय २१,रा. एकता कॉलनी,डांगे चौक,वाकड) याचा मित्र रामचंद्र सरकाळे याच्या प्रकृतीचा धोका टळल्याची माहिती त्यांनी दिली.चेष्टामस्करीतून हा खूनी हल्ला झाला.त्यात आपल्या मित्राला चापट्या मारल्याचा जाब विचारणाऱ्यावर तो या बालगुन्हेगाराने कात्रीने केला.परवा रात्री ही घटना घडली.विष्णू व त्याचा मित्र रामचंद्र हे जेवण करून रुमवर येत होते. त्यावेळी आरोपी बालगुन्हेगार व त्याचा मित्र समोरून आला. हे चौघेही लातूर जिल्ह्यातील असल्याने मस्करीत अल्पवयीन गुन्हेगाराने फिर्यादी विष्णूच्या गालावर चापटी मारल्या.त्याबद्दल रामचंद्रने विचारणा करताच या बालगुन्हेगाराला राग आला.पळतच तो जवळच्या सलूनमध्ये गेला.तेथील कात्रीने त्याने रामचंद्रच्या गळ्यावर दोन वार करीत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला.ही कात्री पोलिसांनी जप्त केली आहे.

