उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःहरित कर्ज रोख्यांतून (ग्रीन बाँड) सुमारे २०० कोटी रुपयांचा निधी नुकताच पिंपरी-चिंचवड महापालिकेने उभा केला.हे हरित कर्ज रोखे इश्यू करणारी पिंपरी ही राज्यातील पहिली,तर देशातील चौथी महापालिका ठऱली.या बाँडचे समारंभपूर्वक लिस्टींग (बेल रिगींग सेरेमनी) मुंबई शेअर बाजारात (बीएसई)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (ता.१०) सकाळी सव्वा दहा वाजता मुंबई शेअर बाजारात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अजित पवार यांच्या उपस्थितीत झाले.यावेळी फडणवीसांनी दोन्ही उपमुख्यमंत्री हे या इश्युमुळे आनंदी असल्याचे सांगत त्यामागील कारणही सांगितले.
शेअर बाजारात लिस्ट होणारी पिंपरी ही राज्यातील पहिलीच महापालिका आहे.तिच्या या सोहळ्याला शहरातील भाजपचे चारही आमदार (भोसरीचे महेश लांडगे,चिंचवडचे शंकर जगताप,विधान रिषद सदस्य उमा खापरे आणि अमित गोरखे), राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक,मुंबई महापालिका आयुक्त भुषण गगराणी यांच्यासह अनेक महापालिकांचे आयुक्त तथा प्रशासक तसेच बीएसई चे सीईओ सुंदररमन राममुर्ती उपस्थित होते.यावेळी सर्व मान्यवरांचे स्वागत पिंपरी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखऱसिंह यांनी रोप देऊन स्वागत केले.यावेळी भाषणात सौनिक यांनी वाढत्या नागरिकीकरणामुळे स्त्रौत उभे करणे (सोर्स रेजिंग) हे एक मोठे आव्हान महापालिकेसमोर उभे राहिले असल्याचे सांगितले.तर,आ.जगताप यांनी आपल्या छोटेखानी मनोगतात पिंपरी मनपा ने आता सोशल बॉण्ड आणण्याची सूचना केली.त्याचा विचार करावा,असे ते म्हणाले.
शे्अर बाजारात लिस्ट होण्याची अत्यंत क्लिष्ट प्रक्रिया पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी शेखरसिंह आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले.तसेच या इश्य़ूला गुंतवणुदारांनी दिलेल्या पाचपट प्रतिसादातून त्यांचा महाराष्ट्र सरकार आणि पिंपरी महापालिकेवरील विश्वास दिसला,असे कौतुगोद्गार त्यांनी काढले.पिंपरी महापालिकेच्या या हरित रोख्याच्या इश्यूतून दोन्ही उपमुख्यमंत्री आनंदी झाल्याचे त्यांनी सांगितले.त्यामागील कारण सांगताना ते म्हणाले,की नगरविकास असलेल्या शिंदेंच्या या खात्याने देशात पहिल्यांदा हे ग्रीन बॉण्ड इश्यू केल्याने ते खूष आहेत.तर,अजितदादा हे यामुळे आनंदी आहेत की आता किमान दोनशे कोटी रुपये मागायला पिंपरी मनपा ही राज्य सरकारकडे म्हणजे त्यांच्या अर्थखात्याकडे येणार नाही,असे मुख्यमंत्री म्हणताच उपस्थितांत हास्याची लकेर उमटली.
कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रगीताने झाली.मानसी सोनटक्के यांनी मराठी,हिंदी,इंग्रजी आणि संस्कृत अशा चार भाषांतून सूत्रसंचालन केले

