वर्धापनदिनासाठी उद्या राष्ट्रवादीचे वीस हजार पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीचे टार्गेट

सोहळ्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार? उत्तम कुटे,संपादक पिंपरीःराष्ट्रवादी कॉंग्रेसचा २६ वा वर्धापनदिन उद्या (ता.१०)बालेवाडी,पुणे येथे होत असून त्याचे यजमानपद पक्षाच्या पिंपरी-चिंचवड,पुणे आणि पुणे ग्रामीण जिल्ह्याला देण्यात आले आहे.राज्यभरातून येणाऱे पदाधिकारी,कार्यकर्ते यांची सोय ते पाहणार आहेत.तसेच त्यांना आपापल्या जिल्ह्यातून प्रत्येकी पाच हजार पदाधिकारी,कार्यकर्ते वर्धापनदिन सोहळ्याला नेण्याचे लक्ष्यही त्यांना देण्यात आले आहे.किमान वीस…

सोहळ्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार?

उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःराष्ट्रवादी कॉंग्रेसचा २६ वा वर्धापनदिन उद्या (ता.१०)बालेवाडी,पुणे येथे होत असून त्याचे यजमानपद पक्षाच्या पिंपरी-चिंचवड,पुणे आणि पुणे ग्रामीण जिल्ह्याला देण्यात आले आहे.राज्यभरातून येणाऱे पदाधिकारी,कार्यकर्ते यांची सोय ते पाहणार आहेत.तसेच त्यांना आपापल्या जिल्ह्यातून प्रत्येकी पाच हजार पदाधिकारी,कार्यकर्ते वर्धापनदिन सोहळ्याला नेण्याचे लक्ष्यही त्यांना देण्यात आले आहे.किमान वीस हजारांच्या उपस्थितीचे टार्गेट या वर्धापनदिनासाठी ठेवण्यात आले आहे.

दुपारी बारा ते अडीच पर्यंत भोजनाची वेळ आहे.त्यानंतर तीन वाजता वर्धापनदिन सोहळा सुरु होईल.त्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,ओबीसी नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि शेवटी अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण होणार आहे.यावेळी पक्षाचे राज्याच्या मंत्रीमंडळातील सारे मंत्री,सर्व आजी माजी खासदार,आमदार,सर्व सेलचे अध्यक्ष,त्यांची कार्यकारिणी उपस्थित राहणार आहे.आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच रणशिंग या मेळाव्यात फुंकले जाण्याची दाट शक्यता आहे.दरम्यान,उद्याच्या वर्धापन दिना कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी पक्षाचे युवा नेते पार्थ पवार व त्यांचे बंधू जय पवार यांनी आज केली.यावेळी त्यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना योग्य त्या सूचना दिल्या.

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातून येणार्‍या पक्ष पदाधिकाऱ्यांची सोय पुणे शहर,उत्तर महाराष्ट्रातून येणाऱ्यांची पिंपरी-चिंचवडसह पुणे ग्रामीण राष्ट्रवादी जिल्हा पाहणार आहे.त्यासाठी त्यांनी काही हॉटेल्सही बुक केली आहेत.तेथे या पदाधिकाऱ्यांना फ्रेश होण्याची तसेच चहा नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली आहे.