संभाजी भिडे यांच्यावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला प्रकृती स्थिर

शरिरीक व मानसिकदृष्ट्या बळकट आणि ठाम विचारांचे नेतृत्त्व करणारे, हिंदुत्ववादी विचारवंत श्री. संभाजी भिडे यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला केला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी, सांगली जिल्ह्यातील त्यांच्या निवासस्थानाजवळ घडली. सकाळच्या नेहमीप्रमाणे ते फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले होते. त्याचवेळी रस्त्यावर भटकणाऱ्या ४-५ कुत्र्यांनी त्यांच्यावर अचानक झडप घातली. यामध्ये त्यांच्या पायाला किरकोळ जखम झाली असून त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुदैवाने त्यांच्या प्रकृतीवर कोणताही गंभीर परिणाम झालेला नाही. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. सांगली शहरासह अनेक शहरी भागांमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. लहान मुले, वृद्ध नागरिक आणि आता तर जेष्ठ व्यक्तींचीही सुरक्षितता धोक्यात आली आहे. या घटनेमुळे स्थानिक प्रशासनावर प्रश्न उपस्थित होत असून, भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी, पालिकेने त्वरित कारवाई करून कुत्र्यांच्या निर्बंधासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे. संभाजी भिडे यांनी मात्र या घटनेकडे अत्यंत शांतपणे आणि संयमाने बघितलं असून, ते लवकरच आपल्या नियमित कामकाजात पुनश्च रुजू होणार आहेत.