चिंचवड देवस्थानचा ड्रेसकोडवर मध्यममार्ग,बंदीऐवजी भक्तांनाच पारंपारिक वेषात येण्याचे केले आवाहन

उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःतोक़ड्या कपड्यांत भक्तांना मंदिरात प्रवेश बंदची सुरवात प्रभादेवी,मुंबई येथील सिद्धीविनायक मंदिरात झाली.त्यानंतर त्यांचा हा कित्ता जेजुरी येथील खंडोबा मंदिरात गिरवला गेला.मात्र,त्याला काहीसा विरोध झाला.त्यातून धडा घेत चिंचवड देवस्थान ट्रस्टने मध्यममार्ग शोधला.अष्टविनायकांतील आपल्या तीन गणेश मंदिरांसह (मोरगावचा मोरेश्वर,थेऊरचा चिंतामणी आणि सिद्धटेकचा सिद्धीविनायक)चिंचवड येथील मोरया संजीवन समाधी आणि खार नारंगी अशा पाच मंदिरासाठी तूर्तास ऐच्छिक ड्रेसकोट पाळण्याचे आवाहन भक्तांनाच केले आहे.ही ड्रेसकोड बंदी नाही,असे देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी आपला आवाज शी बोलताना थोड्या वेळापूर्वी स्पष्ट केले.

मंदिरांचे पावित्र्य भक्तांनी स्वतहून राखण्याचे आवाहन देव महाराज आणि चिंचवड देवस्थानचे दुसरे विश्वस्त अॅड राजेंद्र उमाप यांनी केले आहे.या आवाहनाला काय प्रतिसाद मिळतो,ते पाहू आणि मग काय ते ठरवू,असे देव महाराज म्हणाले.तर, ही ऐच्छिक बंदी असल्याचे अॅड.उमाप यांनी स्पष्ट केले.हा ड्रेसकोड तथा बंदी नसून भाविकांना पारंपारिक वेशात येण्याचे देवस्थानचे हे आवाहन आहे,मंदिरात कसे यायचे हे भक्तांनीच ठरवायचे आहे,असे ते म्हणाले.
दरम्यान,मंदिरात तोकडे कपडे घालून प्रवेश करण्यावरील ही बंदी नसल्याने त्याला विरोध होण्याची शक्यता दिसत नाही.कुठल्या कपड्यात मंदिरात यायचे हे हे भाविकांनीच ठरवायचे आहे,असे सागत चेंडू चिंचवड देवस्थानने ड्रेसकोड बंदीचा हा चेंडू खुबीने भक्तांकडेच टोलवला आहे.