उत्तम कुटे,पिंपरी
पिंपरीः भारतरत्न घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती सोमवारी (ता.१४) मोठ्या उत्साहात संपूर्ण शहरभर साजरी करण्यात आली.यानिमित्त पिंपरी येथील
येथील त्यांच्या स्मारकात अभिवादनासाठी भीमसैनिकांचा महासागर उसळला होता. चिंचवड येथील वूई टुगेदर फाउंडेशनने ही जयंती वेगळ्या पद्धतीने साजरी केली.त्यांनी १२ हुषार आणि गरिब होतकरू मुलांना मोफत सायकली व शालेय साहित्य संच भेट दिला.त्यामुळे या उपक्रमाची चर्चा झाली.
शिका व संघटित व्हा,हा डॉ.बाबासाहेबांचा विचार त्यांच्या जयंतीनिमीत्त या फाऊंडेशनने अंमलात आणला. गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली व शालोपयोगी वस्तूंचे वाटप केले.असे लोकपयोगी व गरजुना मदतीचा हात देणारे उपक्रम फाऊंडेशन वरचेवर घेत असते. आपल्या सदस्यांच्या मदतीने ते अंमलात आणते.जे शक्य आहे, दे देण्याचा प्रयत्न आमचा असतो,असे फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी आपला आवाजला सांगितले.तसेच पुढेही गरजू विद्यार्थ्यांना सायकली देणे सुरुच ठेवणार असल्याचे ते म्हणाले. फाउंडेशनचे सल्लागार रवींद्र सागडे,खुशाल दुसाने,जयंत कुलकर्णी यांचीही यावेळी भाषणे झाली.सचिव मंगला डोळे – सपकाळे,नंदकुमार वाडेकर यांनी शालेय साहित्य तर,मेट्रोपोलिटिन सोसायटीने काही सायकली उपलब्ध करून दिल्या.खजिनदार दिलीप चक्रे यांनी आभार मानले.सामूहिक बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

