२१ पैकी १८ जागा बिनविरोध, एका गटातील तीन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात
उत्तम कुटे
पिंपरीः खेड, शिरूर, मावळ, मुळशी आणि भोर या पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या कासारसाई (ता.मुळशी) येथील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले व उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी सर्वपक्षीय पॅनेल उभे केले.मात्र,खुद्द नाानांच्याच गटात तीन जागांसाठी चार उमेदवार अर्ज माघारीनंतर (ता.२५)रिंगणात राहिल्याने निवडणूक लागली आहे.या तीन जागांसाठी ती ५ एप्रिल रोजी होणार आहे.त्यामुळे अजितदादा,नानांसह स्थानिक खासदार मावळचे श्रीरंग बाऱणे यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर पाणी फिरले आहे.
हा कारखाना मावळ व मुळशी तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या कासारसाई गावचे माजी सरंपच बाळू भिंताडे यांच्यामुळे ही निवडणूक लागली.त्यांना अजितदादांच्या सुचनेनुसार मावळचे आमदार सुनील शेळके,भोरचे शंकर मांडेकर आणि चिंचवडचे शंकर जगताप यांनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला.त्यांचे पुनर्वसन करण्याचा शब्द दिला.पण तो व्यर्थ ठरला.त्यांनी मुदतीत माघार न घेतल्याने हिंजवडी ताथवडे या पहिल्याच गटात निवडणूक लागली.तेथे सर्वपक्षीय श्री. संत तुकाराम शेतकरी विकास पॅनेलचे नाना नवले,चेतन भुजबळ आणि दत्तात्रेय जाधव असे तीन जागांसाठी तीन उमेदवार होते.पण,त्या गटात भिंताडेंनी आपला अर्ज कायम ठेवला.नमूद करण्याजोगी बाब म्हणजे रिंगणात असलेल्या १९५ पैकी तब्बल १७३ उमेदवारांनी २५ तारखेपर्यंत आपले अर्ज नाना आणि दादा (अजित)आणि स्थानिक खासदार,आमदारांमुळे मागे घेतले होते. परिणामी गट १ वगळता २,३,४,५ मधील १३ आणि राखीवमधील ५ असे १८ उमेदवार बिनविरोध झाले होते.पण गट एकमध्ये भिंताडेंमुळे घोळ झाला.तीन जागांसाठी चार उमेदवार राहिले अन तेथे ही निवडणूक लागली.
दरम्यान,२५ तारखेच्या माघारीचा तपशील निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी काल (ता.२७)दिला.त्यामुळे वेगळीच चर्चा झाली.त्यात ते नॉट रिचेबल झाल्याने तिला आणखी जोर आला होता.मात्र, निवडणूक कामामुळे थकवा आला,त्यामुळे पवार आजारी पडले.परिणामी माघारीची माहिती देण्यास दोन दिवसांचा विलंब झाला.त्यांनीच याबाबत खुलासा थोड्या वेळापूर्वी आपला आवाजशी बोलताना केला.दरम्यान,नाना यांच्या पॅनेलला कपबशी हे चिन्ह मिळाले आहे.यापूर्वीही दोनदा तांत्रिक चुकीमुळे कारखान्याची निवडणूक लागली होती. तो अपवाद वगळता बिनविरोध निवडचीच तेथे परंपरा आहे.दरम्यान,यावेळी नव्या संचालक मंडळात पाच जुने,तर १६ नवे चेहरे असणार आहेत.

