उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःविक्रमी म्हणजे लाखापेक्षा अधिक मतांनी विजयी झालेले मावळचे आमदार आणि अजित पवार यांचे कट्टर समर्थक सुनिल शेळके यांची मंत्रीमंडळात वर्णी लागेल,अशी चर्चा झालीहोती.पण,तसे झाले नाही.त्याचे शेळकेंनीही मनाला काही वाटून घेतले नाही.पण,आता विधीमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन संपताच त्यांची रोजगार हमी योजना समितीच्या प्रमुखपदी काल नियुक्ती करण्यात आली.त्यामुळे राज्याच्या ग्रामीण भागातील रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होतआहे.
काल अधिवेशनाचे सूप वाजताच विधीमंडळाच्या विविध समित्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.त्यात शेळकेंची आहे.त्यांनी मागील काही वर्षांपासून ग्रामीण भागातील भौतिक सुविधा आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत.त्यामुळे त्यांची ही नियुक्ती संयुक्तिकच म्हणावी लागेल.परिणामी त्यांच्या नेतृत्वाखाली रोजगार हमी योजनेत ठोस उपाययोजना व नवीन प्रकल्प राबवले जातील,अशी अपेक्षा आता व्यक्त होत आहे.त्यांच्या या नियुक्तीचे मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागातून आज स्वागत झाले.त्यांच्या नेतृत्वामुळे रोजगार हमी योजनेला नवी दिशा मिळेल,अशी आशा तेथील ग्रामस्थांनी व्यक्त केली.ग्रामीण भागातील गरजूंना रोजगार मिळावा आणि त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे,यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहीन,रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून नव्या योजना आणण्याचा मानस आहे,अशी प्रतिक्रिया आ.शेळकेंनी या नियुक्तीवर दिली.
रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी काही बदल आवश्यक असून ते धडाडीचे आमदार शेळके लगेच करण्याची शक्यता आहे.ग्रामीण भागातील नवीन रोजगार प्रकल्पांना गती,कामगारांना वेतनवाढ आणि सोई सुविधा,पारदर्शकता आणि वेगवान अंमलबजावणी,नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने योजनेचा प्रभावीपणे अंमल हे बदल ते करू शकतात. डॉ.संजय कुटे, डॉ.सुरेश खाडे,अमोल जावळे,विजयकुमार देशमुख,राजेश बकाने,हरिष पिंपळे,विनोद अग्रवाल,महेश चौघुले, राजेश वानखडे,विश्वनाथ भोईर,आमश्या पाडवी,शांताराम मोरे,हिकमत उढाण,काशिनाथ दाते,शंकर मांडेकर,संजय दरेकर,नितीन देशमुख,शिरीषकुमार नाईक आणि बापूसाहेब पठारे हे समितीचे सदस्य आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व एकनाथ शिंदे तसेच इतर वरिष्ठ नेत्यांनीआ. शेळके यांचे या नियुक्तीनंतर अभिनंदन केले.त्यांच्या नेतृत्वाखाली रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी होईल, असा विश्वास व्यक्त केला.

