आग लावली रेल्वेने,तिचा फटका बसला दुसऱ्या सरकारी उपक्रमाला

एच.ए.कंपनीत निष्काळजीपणातून कशी लागली दुसऱ्यांदा मोठी आग

उत्तम कुटे,संपादक
पिंपरीः येथील हिंदूस्थान अॅन्टिबायोटिक्स (एचए) कंपनी आवारातील झाडे आणि भंगार सामान आज दुपारी लागलेल्या मोठ्या आगीत जळून खाक झाले.किती नुकसान झाले त्याचा लगेच अंदाज आला नाही.कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या रेल्वे मार्गाजवळील वाळलेल्या गवताला रेल्वे प्रशासनाने दुपारी आग लावली होती.त्याची ठिणगी उडून लागलेल्या आगीत एच.ए.कंपनीचे भंगार सामान जळून गेले.जिवीतहानी झाली नाही. पण,अग्निशमन दलाची मोठी धावपळ उडाली.

mostbet

दुपारी तीन वाजून २७ मिनिटांनी एच.ए.कंपनीत आग लागल्याचा कॉल फायर बिग्रेडला आला.तात्काळ काही मिनिटातच जवळच्या नेहरूनगर मुख्य अग्निशमन केंद्रांतील सर्व बंब घटनास्थळी धावले.चिखली येथे गेल्यावर्षी ९ डिसेंबरला लागलेल्या मोठ्या आगीच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेत रसायने असलेल्या या कंपनीत अग्निशमन दलाचे सर्व १७ बंब आले.दोन खासगी बंबानाही बोलावण्यात आले होते.मात्र,आग ही कंपनीत नसून आवारात भंगार व वाळलेली झाडे व गवताला लागल्याचे दिसले. आग विझवण्यासाठी कंपनीत पुरेसे पाणी नसल्याचे तसेच तेथील अग्निशमन यंत्रणा बंद असल्याचेही अग्निशमन दलाला आढळले.ही आग रेल्वे प्रशासनाने रेल्वेमार्गाजवळील गवताला लावलेल्या आगीमुळे लागल्याचे स्थानिक पिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कडलग यांनी आपला आवाजला सांगितले.

यापूर्वीही ४ जून २०२० मध्ये एच.ए.कंपनीत आग लागली होती.त्यात निष्काळजीपणा केल्याबद्दल कंपनीला नोटीस देण्यात आली होती. त्यात अग्निशमन दलाने आढळलेले काही आक्षेप नोंदवले होते.त्यामध्ये त्यांनी ज्वलनशील वस्तू आवारात इतस्तत पडल्याचे नमूद केले होते.त्यावेळी आवश्यक पाणीपुरवठा दिसून आला नव्हता.तो पाच वर्षानंतर आजही आढळला नाही.उलट कंपनीने दुसऱ्या एका आग लागू शकणाऱ्या रासायनिक कंपनीला आपली काही भागा भाड्याने दिल्याचे दिसून आले.त्यावेळी कंपनीतील अग्निशमन यंत्रणा उपलब्ध झाली नव्हती.तसेच तेथील सुरक्षारक्षकांनी तिचा वापर केला नसल्याचे दिसले होते.त्याची पुनरावृत्ती आजही झाली.२०२० लाच वाळलेली झाडे व गवत कंपनी आवारात होते.त्यामुळे आग लागण्याचा धोका होता.पण,ते गेल्या काही वर्षात काढण्यात वा छाटण्यात आले नाही.परिणामी तेच आजच्या आगीत भक्ष्यस्थान पडले.पहिल्या आगीत कंपनीच्या सुरक्षारक्षकांना आगीच्या परिस्थितीत काय करावे,याचे प्रशिक्षण न दिल्याचे दिसून आले होते.दुसरी आग लागली तरीही ही परिस्थिती जैसे थे च असल्याचे आढळले.