शिवजयंती महाउत्सव यावर्षी चार दिवस होणार

शिवछत्रपती महाआरती,बैलगाडा शर्यत,कबड्डी,कुस्ती,मर्दानी खेळांसह सांस्कृतिक कार्यक्रम

पवन गाडेकर, निवासी संपादक आणि किरण वाजगे, कार्यकारी संपादक

mostbet

जुन्नर/ नारायणगाव :-
यावर्षीची शिवजयंती ही आगळीवेगळी होणार असून शिवजयंती महाउत्सव सतत चार दिवस होणार असल्याची माहिती जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी आज पत्रकार परिषदेत जुन्नर येथे दिली
या शिवजयंती महाउत्सवानिमित्त किल्ले शिवनेरी गडाच्या पायथ्याशी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये शिवछत्रपती महाआरती, बैलगाडा शर्यत, कबड्डी च्या स्पर्धा कुस्त्यांचा भव्य आखाडा,मर्दानी खेळांसह शोभायात्रा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे

आज जुन्नर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार सोनवणे बोलत होते. याप्रसंगी माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराम लांडे, Sham वाळुंज, सुरज वाजगे, दिपेश परदेशी, अविनाश कर्डीले, संध्या भगत शाम खोत, संदिप लेंडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
दिनांक 16 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी या दरम्यान होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये दिनांक 16 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे व शोभेच्या दारू कामाचे आतषबाजी होणार आहे तसेच भव्य छत्रपती अंबारी थ्रीडी वेस्ट शिवकालीन शौर्य मावळावेस येथेही फायर शो होणार आहे 17 व 18 फेब्रुवारी रोजी भव्य बैलगाडाच्या शर्यती होणार असून मोठी बक्षिसे यावेळी ठेवण्यात आली आहेत 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता वजनी गट कबड्डी स्पर्धा होणार असून सायंकाळी आठ वाजता शंकरराव गोटे पाटील मैदानावर शिव सह्याद्री ऐतिहासिक महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक 18 रोजी शिवनेर केसरी ही भव्य कुस्ती स्पर्धा होणार असून या स्पर्धेसाठी चांदीची कथा चषक ढाल व रोख रक्कम असे पारितोषिक ठेवण्यात आले आहेत त्याच दिवशी रात्री बारा वाजता छत्रपती शिवरायांना मानवंदना व फायर शो व रात्री आठ वाजता गौरव माझ्या महाराष्ट्राचा हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे 19 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच मंत्री गण यांचे उपस्थितीत शिवजयंती महोत्सव होणार असून सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजता जुन्नर तालुक्यातील तसेच नरवीर तानाजी मालुसरे प्रतिष्ठानच्या वतीने विविध मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले आहे सायंकाळी पाच वाजता पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते शिवछत्रपतींची महाआरती होणार असून सायंकाळी सहा वाजता शिवतीर्थ प्रतिष्ठान व शिवजयंती महोत्सव समिती यांच्यावतीने भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे रात्री सात वाजता प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत कॉन्सर्ट यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे अशी माहिती आमदार सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.