उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःकुदळवाडी,चिखली येथे अतिक्रमणांवर सलग तिसऱ्या दिवशी सोमवारी (ता.१०)पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोठा हातोडा मारला. ६८२ बांधकामे पाडून ३३ लाख ५८ हजार १३० चौरस फूट क्षेत्र मोकळे केले.गेल्या तीन दिवसांत २७६ एकरमधील १ कोटी २० लाख ७२ हजार चौरस फूट जागेवरील अतिक्रमण पाडण्यात आले.

शनिवार,रविवार या सुट्टीच्या दिवसानंतर सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी अतिक्रमण कारवाई सुरु राहिली. ७७ एकरावर ती झाली.त्यात नियोजित विकास आरक्षणे आणि नागरिकांच्या सुविधांसाठी असलेल्या जागेवर झालेले अतिक्रमण हटविण्यात आले.हा कारवाईचा धडाका पुढेही सुरुच राहणार आहे.असे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखालीअतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील,उपायक्त मनोज लोणकर, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी राजेशआगळे, सुचेता पानसरे, अमित पंडित, किशोर ननवरे, उमेश ढाकणे, अजिंक्य येळे, शितल वाकडे, श्रीकांत कोळप यांच्यासह कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता
त्यात सहभागी झाले.त्यासाठी सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अतिरिक्त पोलिस आयुक्त
वसंत परदेशी यांच्या अधिपत्याखाली पोलीस उपआयुक्त स्वप्ना गोरे, डॉ. शिवाजी पवार,
संदीप डोईफोडे, विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवला गेला होता.महावितरणचे
अधिकारी कर्मचारीही या विशेष मोहिमेत सामील झाले होते.महापालिकेच्या धडक कारवाई पथकामधील ४ कार्यकारी
अभियंते, १६ उपअभियंते, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १८० जवान, ६०० पोलीस आणि मजूर
कर्मचारी यांनी हा हातोडा चालवला. त्यासाठी १६ पोकलेन, ८ जेसीबी, १ क्रेन आणि ४ कटर यांचा वापर करण्यात आला.खबरदारी म्हणून ३ अग्निशमन वाहने आणि २ रुग्णवाहिका तयार ठेवण्यात आल्या होत्या.
तारीख- किती एकरवर झाली कारवाई – पाडलेली बांधकामे – मोकळे केलेले क्षेत्र चौरस फुटांत
८ फेब्रुवारी – ४२ एकर -२२२ – १८ लाख ३६ हजार
९ फेब्रुवारी – १५७ एकर -६०७ – ६८ लाख ७८ हजार
१० फेब्रुवारी – ७७ एकर -६८२ – ३३ लाख ५८ हजार चौरस फूट
एकूण – २७६ एकर – १०५१ – १ कोटी २० लाख ७२ हजार

