झालं गेलं… म्हणत मावळचे खासदार,आमदार एकत्र आले,विकासाचे राजकारण करण्याचे ठरले

उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःलोकसभेला महायुतीत शिवसेनेकडून खासदार श्रीरंगअप्पा बारणे यांच्या मावळमधील उमेदवारीला कडाडून विरोध करणारे युतीतीलच राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके हे दोन प्रतिस्पर्धी रविवारी (ता.९) चक्क एका व्यासपीठावर आले.एवढेच नाही,तर दोघांत गप्पा व हास्यविनोद झाले. मावळच्या विकासासाठी एकजुटीने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.झालं गेलं गंगेला मिळालं असे म्हणत दोघांनी महायुती म्हणून एकत्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची घोषणा केल्याने मावळ तालुक्यात तो मोठा चर्चेचा विषय झाला.महायुतीचा आभार मेळावा हे त्यासाठी निमित्त ठरले.

या मेळाव्यात खासदार,आमदारांनी एकमेकांवर स्तुतीसुमने उधळल्याने त्याची चर्चा झाली.त्याचवेळी माजी मंत्री भाजपचे बाळा भेगडे व त्यांच्या सहकाऱ्यांची अनुपस्थिती खटकली. यावेळी सर्वात जास्त राष्ट्रवादीचे व त्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.तर, भाजपचे कमी होते. त्यांची तालुका कोअर कमिटी गैरहजर होती.सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय असल्याचे.आ.शेळके यांनी यावेळी सांगितले.वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्सवर हा मेळावा झाला.विधानभा नाही,परंतू लोकसभेसाठी त्याला उशीर झाला.कारण विधानभा निवडणुकीला तीन महिने झाले,असले,तरी लोकसभेला,मात्र तब्बल आठ महिने उलटल्यानंतर हा आभार मेळावा झाला.

खासदार अप्पांशी (बारणे)तडजोड केल्यासंदर्भात आ. शेळके यांनी जो मावळसाठी उभा राहणार त्याला साथ देणार असे स्पष्टीकरण दिले.तसेच मावळ तालुक्याचे हित आणि विकासासाठी काळाजी गरज म्हणून एकत्र आलो,असे ते म्हणाले.याच मुद्यावर काल त्यांनी मतदारांचे आभार मानतानाही भर दिला.लोकसभा निवडणुकीत मावळमध्ये झालेला विसंगतपणा त्यांनी मान्य केला.त्यानंतर झालेल्या विधानसभेला मावळात विचारवाद नाही,तर व्यक्तीवाद दिसला,असा टोला त्यांनी बाळा भेगडे व इतरांचे नाव न घेता लगावला.त्यामुळे ही लढाई विचाराची नाही,तर वादाची झाली.असे ते म्हणाले.त्याचा त्रास मला कुटुंबापर्यंत झाला,ही मोठी शोकांतिका ठऱली,अशी खंत त्यांनी व्यक्त केली.तरीही आता सुडबुद्धीचे राजकारण कऱणार नाही,असा शब्द त्यांनी दिला.याचा अर्थ मी घाबरलो असा घेऊ नये,असा इशाराही देण्यास ते विसरले नाहीत.मी पराभूत होणार नव्हतो,हे मला माहित होतं, उलट वीस हजार मते आणखी मिळायला हवी होती,असे ते म्हणाले.कामांना बोलवा,कार्यक्रमांना नको,अशी साद त्यांनी घातली.सोमाटण्याचा टोलनाका बंद करण्याचा पुनरुच्चारही केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *