जखमींमध्ये शाळकरी मुलांचा समावेश
कैलास बोडके

ओतुर (ता.जुन्नर) पोलीस स्टेशन हद्दीतील धोलवड फाट्या नजीक पीकअप टेम्पो व कार च्या समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत एकूण १९ जन जखमी झाले असल्याची माहिती ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी दिली. सदर अपघात दि.०७ रोजी सकाळी साडेनऊ वाजनेचे सुमारास ओतुर,ओझर ते नारायणगावकडे जाणारे रोडवर धोलवड फाटा येथे ओतुर बाजुकडुन नारायणगाव बाजुकडे जाणारी पिकअप टेम्पो( एम एच १४ जी यु १५६६ ) व नारायणगाव बाजुकडुन ओतुर बाजुकडे येणारी फियाट लिना कार ( एम एच १२ जी एफ ०८६०) यांची समोरासमोर धडक होवुन अपघात झाला असुन अपघातील पिकअप मध्ये जिल्हा परिषद प्रथमिक शाळा आळु ता. जुन्नर, जि. पुणे या शाळेतील विध्यार्थी व पालक हे खोडद ता. जुन्नर. जि. पुणे येथे शालेय शैक्षणिक साहित्य वाटपाचे कार्यक्रमा निमित्त जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला.
अपघातातील जखमींची नावे पुढीलप्रमाणे : 1)अरविंद बबनराव हांडे( वय 55 ) चालक – रा. पिंपळगाव जोगा ता जुन्नर जि पुणे.
ईश्वरी मोहन बोकड (वय ८),
यश पंडित घाडगे (वय ७ ) ,सार्थक प्रकाश साळवे (वय ८ ),
ऋषी राजेंद्र भले( वय ८),
कुणाल भगवान लोहकरे (वय ७ ),
सर्वेश पोपट बोकड (वय ७),
श्रेया भाविक धोत्रे (वय ८),
शिवांश सुधिर सस्ते (वय ८) ,आदित्य संपत तळपे( वय ९),
मीना भगवान लोकरे( वय २३),
प्रकाश कचरू साळवे (वय ३९ ),
विठ्ठल रखमा गाडगे( वय ७०),
कल्पना भिमराव धोत्रे (वय ५०) सर्व रा आळू ता जुन्नर जि पुणे.
सुधीर जगन सस्ते (वय ४२ ) रा पिंपळगाव जोगा ता जुन्नर जि पुणे.
तसेच कार मधील हर्ष दिनेश शहा (वय २४) रा आदिनाथ सोसायटी, पुणे ता हवेली जि पुणे (चालक),
ऋग्वेद युवराज पुसदकर( वय 22 ) रा पुणे.
हिमांशू किशोर पांडे रा. नऱ्हे पुणे,
सुरज संतोष मोरे (वय २६ ) रा धनकवडी पुणे
प्रतीक दुनगुले पूर्ण नाव माहित नाही रा पुणे. असे एकूण १९ जन जखमी झाल्याने विविध खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे वृत्त आहे. अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार सुरेश गेंगजे, शामसुंदर जायभाये, संदीप भोते, किशोर बर्डे, मयुरी खोसे, शुभम काशीद हे तातडीने हजर झाले होते.
या अपघाताचा पुढील तपास ओतूर पोलीस करीत आहेत.

