किर्तनकार मोरेनंतर पीएसआय गुंजाळांनी जीव दिला
उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःदोन दिवसांपूर्वीच (ता.५) संत तुकाराम महाराज यांचे वंशज, प्रसिद्ध किर्तनकार आणि व्याख्याते शिरीष महाराज मोरे (वय ३२)यांनी राहत्या घरी देहू येथे गळफास घेऊन आत्महत्या केली.त्यामुळे मावळात मोठी खळबळ उडाली होती. कर्जबाजारी झाल्याने या महिन्यात २० तारखेला लग्न असलेल्या शिरीष महाराजांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली होती. त्यानंतर पुण्यात खळबळ उडविणारी दुसरी आत्महत्या आज मावळात झाली.खडकी पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक तथा फौजदार (पीएसआय) अण्णा गुंजाळ यांनी लोणावळ्यातील टागगर पॉंईटजवळ झाडाला गळफास घेऊन जीव दिला.