आमदार लक्ष्मणभाऊ चषक 2025 फुल पीच डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

लोकनेते लक्ष्मण पांडुरंग जगताप यांच्या ६२ व्या जयंतीनिमित्त आमदार लक्ष्मणभाऊ चषक २०२५ फुल पीच डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा दिनांक ८ ते १५ फेब्रुवारी २०२५ दरम्यान पी.डब्लू डी ग्राउंड, सांगवी येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर IPL च्या धर्तीवर खेळण्यात येणाऱ्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये एकूण ८४ संघ व ११७६ खेळाडू सहभागी होणार आहेत.
आमदार लक्ष्मणभाऊ चषक २०२५ फुल पीच डे-नाईट टेनिस बॉल स्पर्धा IPL च्या धर्तीवर खेळविताना प्रेक्षकांकरिता प्रशस्त गॅलरी, दोन LED स्क्रीन , खेळाडूंनी थर्ड अम्पायरकडे मागितलेल्या निर्णयाला थर्ड अम्पायर व मॅच रेफरीकरिता अत्याधुनिक ड्रोन प्रणालीचा वापर करून रिप्ले LED च्या स्क्रीनद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञाने तपासून निर्णय देण्याची सोय करताना, सर्व सामने युटूब लाइव्ह बघण्याची सोय करण्यात आली आहे. प्रत्येक मॅचच्या सामनावीर खेळाडूना ७ प्रकारची बक्षिसे व विजेत्या, उपविजेत्या संघांना एकूण ७ लक्ष रुपयाची बक्षिसे व भव्य चषकाचे वितरण करण्यात येणार आहे.
आमदार लक्ष्मणभाऊ चषक २०२५ फुल पीच डे-नाईट टेनिस बॉल स्पर्धेचे उद्घाटन शनिवार दि. ८ फेब्रुवारी २०२५ रोजी सायं.६.३० चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *