मोठ्ठा आवााज करणाऱ्या बुलेटस्वारांच्या कानामागे कोणी काढला आवाज

उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःदिवसा शाळा,कॉलेजच्या बाहेर,तर रात्री निवासी भागात कर्णकर्कश आवाज काढून त्रास देणाऱ्या टवाळखोरांची मस्ती उतरविण्यास उद्योगनगरीत यमुनानगर,निगडी या भागामध्ये कालपासून (ता.३) सुरवात झाली.मनसे आणि भाजपच्या स्थानिक माजी नगरसेवकांनी हा उपक्रम सुरु असून त्यात २५ बुलेटस्वारांना धडा शिकवण्यात आला.यामुळे विद्यार्थिनी,महिला व ज्येष्ठांना मोठा दिलासा मिळाला.खरं,तर पोलिसांनी करायची ही कारवाई माजी लोकप्रतिनिधींनी सुरु केली असून हा मोठ्ठा उपद्रव असलेल्या संपूर्ण शहरात त्याचे अनुकरण होण्याची गरज आहे.दरम्यान,गेल्या लोकसभा, विधानसभेला न झालेली भाजप,मनसेची युती यानिमित्ताने,मात्र पिंपरी-चिंचवडमध्ये झाल्याचे पहावयास मिळाली.

शालेय परिसरात मोठ्ठा आवाज करीत बुलेट स्टंट करणाऱ्या रोड रोमिओंच्या कानामागे,तर मनसेने आवाजच काढला.त्यांना दणका दिला. यमुनानगर येथील एकाच प्रभागातील मनसेचे माजी नगरसेवक सचिन चिखले, भाजपचे माजी नगरसेवक उत्तम केंदळे आणि भाजपच्याच माजी नगरसेविका कमल घोलप यांचे पती बापू घोलप यांनी कालपासून टवाळखोरांचा नक्षा उतरविण्यास सुरवात केली. त्याबाबत मोठ्या संख्येने तक्रारी आल्याने हे पाऊल उचललल्याचे चिखले आणि केंदळे यांनी आपला आवाजला सांगितले.काल व आज त्यांनी आपल्या प्रभागातील माता अमृतानंद शाळा , शिवभूमी शाळा, मॉर्डन शाळा,SPM शाळा परिसरात बेफाम बुलेट स्टंट करणाऱ्या रोड रोमिओंचा पाठला करुन त्यांना दणका दिला. एवढेच नाही,तर त्यांच्या बुलेट पोलिसांच्या हवाली केल्या. टिंगलटवाळी करणाऱ्या या तरुणांना त्यांच्या पालकांच्या हजेरीत पोलिस ठाण्यावर आता समज दिली जाणार आहे.त्यानंतरच त्यांच्या गाड्या त्यांना परत केल्या जातील.दरम्यान,मनसे स्टाईलच्या या थेट कारवाईचे स्थानिकांनी जोरदार स्वागत केले आहे.

ही कारवाई दररोज पुढेही सुरु राहणार नसून ती अधिक तीव्रही केली जाणार असल्याचे चिखले व केंदळेंनी सांगितले.परिणामी,यमुनानगर,निगडी भागातील हा त्रास कालपासून कमी झाला.याबाबत सजग नागरिकांनी अशा उपद्रवी टोळक्याविरुद्ध तक्रारी द्याव्यात,असे आवाहन करण्यात आले आहे. शाळा सुटताना मुलींना त्रास देणे,वृद्धांना हैराण करणे, स्टंट करत उगाचच शो ऑफ करणे, सिगारेट ओढून परिसर अस्वच्छ करणे,अश्लील वर्तन करणे या असभ्य वर्तनावर आता आळा घालणार असल्याचे या माजी नगरसेवकांनी सांगितले.नागरिक आणि शहराच्या सुरक्षिततेसाठी हा लढा असल्याचे मनसेचे शहरप्रमुखही असलेले चिखले म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *