नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस ग्राम सुरक्षा दल व पत्रकारांच्या बैठकीचे आयोजन

शासन, स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्तींच्या मदतीने सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज बसविणार – आमदार शरद सोनवणे यांची ग्वाही

(नारायणगाव :- किरण वाजगे कार्यकारी संपादक)
वाढत्या चोऱ्या तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने जुन्नर तालुक्यातील सर्वच सार्वजनिक ठिकाणी शासनाच्या वतीने तसेच स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्तींच्या मदतीने सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात येणार असल्याची ग्वाही आमदार शरद सोनवणे यांनी दिली.
वाढत्या चोऱ्या व घरफोड्या यापुढे होऊ नये तसेच नागरिकांनी सुरक्षितते बाबत काय काळजी घ्यावी या संदर्भात आज दिनांक १ फेब्रुवारी रोजी नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीमधील सर्व ग्राम सुरक्षा दलाचे जवान,पोलीस पाटील,सरपंच,तंटामुक्ती अध्यक्ष तसेच पत्रकार यांची नारायणगाव पोलीस स्टेशन येथे बैठक घेण्यात आली. याप्रसंगी आमदार सोनवणे बोलत होते.
या बैठकीमध्ये जुन्नर चे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांनी व सहाय्यक पोलीस निरीक्षक। महादेव शेलार यांनी ग्राम सुरक्षा दलातील जवानांना मार्गदर्शन केले त्याचबरोबर आमदार शरद सोनवणे यांनी पोलीस पाटलांनी वाड्या वस्त्यांवरील ग्रामसुरक्षा दलातील जवानांना ऍक्टिव्ह करून स्वतःच्या पदाप्रमाणे शासनाने सोपवलेली जबाबदारी पार पाडावी व आपले गाव कसे सुरक्षित राहील याबाबत पुढाकार घ्यावा.तसेच सीसीटीव्ही कॅमेरा संदर्भात जुन्नर तालुक्यामधील सर्व पोलीस स्टेशनचे एक्झिट पॉईंट सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्याने कव्हर करणार असलेबाबत आमदार शरद सोनवणे यांनी ग्वाही दिली.
या कार्यक्रमासाठी उपस्थित ग्राम सुरक्षा दलातील जवानांना सुरक्षेच्या कारणास्तव बॅटरी , टी-शर्ट तसेच शिट्ट्यांचे वाटप करण्यात आले.
या मीटिंगसाठी जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, संतोष नाना खैरे, नारायणगावचे सरपंच योगेश उर्फ बाबू पाटे,वारूळवाडी सरपंच राजेंद्र मेहेर,भागेश्वर डेरे,ज्ञानेश्वर औटी ग्राम सुरक्षा दलाचे जवान,पोलीस पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष व पत्रकार बांधव उपस्थित होते.सदर कार्यक्रमासाठी आकाश बोरकर,विशाल बानखेले,प्रमोद पिंगळे,अजय राऊत पोलीस पाटील धनगरवाडी,प्राध्यापक काशिनाथ आल्हाट सर यांचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *