दि. ३० जानेवारी रोजी सकाळी सुमारे ०८:०० वाजता वल्लभनगर गोल मंडई (ह क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत) येथे साफसफाई करताना सफाई कर्मचारी श्री सागर डावकर याला नवीन आयफोन सापडलं. त्यांनी तात्काळ आरोग्य विभाग यांच्या वरिष्ठ अधिकारी व ॲड. सागर चरण युवा मंच यांना संपर्क साधून सर्व घटना सांगितली. संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. अतुल शेटे यांना ॲड. सागर चरण यांना घटनेची कल्पना दिली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गोरख कुंभार, पोलीस निरीक्षक श्री. शशिकांत गाडेकर यांच्या मदतीने हरवलेल्या फोनचे मालक श्री. हरीश अमृतकर यांच्याशी संपर्क साधून त्यांचा हरवलेला आयफोन त्यांना परत आणण्यात आला.
ॲड. चरण म्हणाले, प्रत्येक नागरिकांनी आपले कर्तव्य वेळेत आणि प्रामाणिकपणे पार पाडले तर हरवलेली मालमत्ता संबंधित धारकास त्वरित परत मिळण्यास मदत होईल.
सफाई कर्मचारी श्री. डावकर यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक पोलीस व ॲड. सागर चरण युवा मंच यांच्या मार्फत करण्यात आला, यावेळी, संत तुकाराम नगर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभाग तक्रार निवारण समितीचे माजी उपाध्यक्ष ॲड. सागर चरण, अनुसूचित जाती जमाती आणि पिछड़ावर्ग संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अजीमुद्दीन अन्सारी, पोलीस उपनिरीक्षक शशिकांत गाडेकर, पोलीस एएसआय महाजन, सामाजिक कार्यकर्ता विजय वांजळे व इत्यादी उपस्थित होते.