महामंडळ अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्याची शिरसाटानंतर आता मंत्री गोगावलेंची बारी ?

उत्तम कुटे,संपादक
पिंपरीः मंत्र्यांना कोणत्याही महामंडळाचे अध्यक्ष वा सदस्य राहता येत नाही,असा नियम राज्यात आहे.मात्र, त्याला अपवाद नव्या मंत्रीमंडळातील दोन मंत्री असून ते शिवसेनेचे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक आहेत.त्यातील सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा सिडको अध्यक्षपदाचा राजीनामा त्यांनी तो न दिल्याने परवा (ता.१६) घेण्यात आला.त्यामुळे आता असा दुहेरी पदभार असलेले रोजगार हमी मंत्री भरत गोगावले तो कधी देणार याची उत्सुकता आहे.का त्यांचाही शिरसाटांसारखा राजीनामा घेतला जाणार याकडे आता लक्ष लागले आहे.

एक व्यक्ती,एक पद हे तत्व भाजपमध्ये अपवाद वगळता पाळले जाते. त्यामुळे भाजपप्रणित राज्यातील महायुती सरकारमध्ये त्याचा अंमल होणे स्वाभाविक आहे.तसेच मंत्री न झाल्याने युतीतील तिन्ही पक्षांचे अनेक आमदार नाराज आहेत.त्यांची ही नाराजी भरून काढण्यासाठी त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेले महामंडळाचे अध्यक्षपद दिले जाणार आहे.पण, त्यापूर्वी प्रजासत्ताकदिनासाठी पालकमंत्री नियुक्ती केली जाणार आहे. पण,ती ही जसा नवे सरकार,मंत्रीमंडळ आणि खाते वाटपासारखीच रखडली आहे.आता,मात्र २६जानेवारी जवळ आल्याने ती केव्हाही होऊ शकते.अमूकच जिल्ह्यात ती व्हावी म्हणून मंत्र्यांतच मोठी रस्खीखेच सुरु आहे.त्यातून या नियुक्तीत दडलंय काय,अशी कुजबूज ऐकायला मिळाली.या नेमणुका झाल्यानंतर महामंडळाच्या त्या होणार आहेत.त्यासाठीच यापूर्वीच्या सरकारमध्ये मंत्रीपदासाठी कोट शिवूनही ते न भेटलेले व अखेरच्या टप्यात काही महिन्यांसाठी महामंडळ अध्यक्षपदावर समाधान मानावे लागलेले शिरसाट व गोगावलेंच्या या पदावर ते मंत्री झाल्याने आता फडणवीसांमुळे संक्रात आली आहे. कारण त्यांनीच प्रथम शिरसाटांना सिडकोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला सांगितला,पण तो त्यांनी तो दिला नाही.मग, तो घेण्यातच आला.त्यामुळे आता गोगावले तो कधी देणार याकडे आता लक्ष लागले आहे.तो त्यांनी द्यावा अशीच अपेक्षा तथा मागणी आहे.पण,जर तो त्यांनी दिला नाही,तर त्यांच्यावरही शिरसाटांसारखी पाळी येण्याचीच दाट शक्यता आहे. ते राज्य परिवहन महामंडळ तथा एसटीचे अध्यक्ष आहेत. आपल्या बेधडक स्वभावाप्रमाणे तोट्याच्या गाळात रुतलेले एसटीचे चाक बाहेर काढण्यासाठी काही धडाकेबाज निर्णय घेण्यास नुकतीच सुरवातही केली होती. तसाच कारभार शिरसाटांनीही सुरु केला होता. काही वसतीगहांची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील दुरवस्था व गैरकारभार त्यांनी पाहताच त्यांनीही आपल्या बिनधास्त प्रकृतीनुसार कारवाई सुरु केली होती.पण,त्यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याने त्याला ब्रेक बसला. तसाच तो गोगावलेंनाही आता बसणार आहे.त्यामुळे त्यांना त्यांची कार्यक्षमता ही आता आपापल्या खात्याच्या कारभारातच दाखवून द्यावी लागणार आहे.दरम्यान, शिरसाटांच्या राजीनाम्यानंतर सिडको अध्यक्षपदासाठी जोरदार लॉबिंग लगेचच सुरु झाले. तसेच ते गोगावलेंनी देताच एसटीच्या अध्यक्षपदासाठीही सुरु होईल.इतर महामंडळं आणि समित्या अध्यक्ष व सदस्य नेमणुकीसाठी युतीतील तिन्ही पक्षांच्या प्रमुखांकडे अगोदरच ते जोरात सुरुही झालं आहे.