जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान व स्व-स्वरूप संप्रदायातर्फे रक्तदान महायज्ञ महाराष्ट्रासह अनेक राज्यात महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. त्याची सुरुवात झाली असून ते १९ जानेवारी पर्यंत ती सुरू राहणार आहेत. अधिकाधीक लोकांनी रक्तदान करून राष्ट्राची सेवा करावी, असे आवाहन नाणीज पीठाचे उत्तराधिकारी कानिफनाथ महाराज यांनी केले आहे.
जानेवारी या महिन्यात सर्वत्र रक्ताचा तुटवडा निर्माण होत आहे. हे लक्षात घेऊन जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानतर्फे हा महा रक्तदानाचा संकल्प केला आहे. महाराष्ट्रासह गोवा, गुजरात, छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा आदी राज्यात ही शिबिरे सुरू झाली आहेत. हे संकलन महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदे अंतर्गत सर्व रक्तपेढ्या संकलित करणार आहेत. त्याचा उपयोग शासकीय रुग्णालयातील रुग्णांना होणार आहे. दिनांक 4 जानेवारी ते 17 जानेवारी पर्यंत 101113 रक्तकूपिका संकलन जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान तर्फे संकलित करण्यात आल्या आहेत. 19 जानेवारी पर्यंत महाराष्ट्रभर शिबीरे सुरू आहेत.

