वाल्मिकमुळे मुंडेंचं,तर नाराजीमुळे भुजबळांचं स्टार प्रचारकपद गेलं

तीस उमेदवारांसाठी राष्ट्रवादीने वीस स्टार प्रचारक प्रचारात उतरवले उत्तम कुटे,संपादक पिंपरीःयेत्या ५ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेची होणारी निवडणूक ही बहूरंगी होणार असली,तरी खरी व थेट लढत ही भाजप विरुद्ध आम आदमी पार्टी (आप) अशीच होईल. आपच्या हातातून तेथील सत्ता हिसकावून घेण्याचा चंग भाजपने यावेळी बांधला आहे.महाराष्ट्रात विधानसभेला मोठे यश मिळाल्याने अजित पवार राष्ट्रवादीने दिल्ली विधानसभा यावेळी…

तीस उमेदवारांसाठी राष्ट्रवादीने वीस स्टार प्रचारक प्रचारात उतरवले

उत्तम कुटे,संपादक

पिंपरीःयेत्या ५ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेची होणारी निवडणूक ही बहूरंगी होणार असली,तरी खरी व थेट लढत ही भाजप विरुद्ध आम आदमी पार्टी (आप) अशीच होईल. आपच्या हातातून तेथील सत्ता हिसकावून घेण्याचा चंग भाजपने यावेळी बांधला आहे.महाराष्ट्रात विधानसभेला मोठे यश मिळाल्याने अजित पवार राष्ट्रवादीने दिल्ली विधानसभा यावेळी लढण्याचे ठरविले असून तीस उमेदवार दिले आहेत.त्यांच्यासाठी वीस स्टार प्रचारक मैदानात उतरवले आहे.त्यातून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि मुलूखमैदान तोफ तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री धनजंय मुंडे यांचा पत्ता कट केला आहे.

मंत्रीमंडळात स्थान न दिल्याने भुजबळांनी पक्षावर नाराजी व्यक्त केलेली नाराजी आणि वाल्मिक कराडमुळे मुंडेंचा दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून पत्ता कट झाल्याचे समजले.मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घूण हत्येच्या मोक्काच्या गुन्ह्यात मुंडेंचा राईट हॅण्ड कराड आरोपी असून सध्या तो पोलिस कोठडीत आहे. परळी येथील एका पवनचक्की ऊर्जा निर्मिती कंपनीकडेही त्याने दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा दुसरा गुन्हा त्याच्याविरुद्ध नोंद झालेला आहे.त्यातून मुंडे हे अडचणीत आले असून त्यांचा मंत्रीपदाचा राजीनामाही घेतला जाऊ शकतो.पण,त्यापूर्वीच बीड जिल्हाच नाही,तर राज्यभर मोठी खळबळ उडवून दिलेल्या देशमुख प्रकरणामुळे राष्ट्रवादी तथा या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी मुंडेंना चार हात दूर ठेवण्याचे ठरवले आहे.त्यातूनच दिल्ली निवडणुकीच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून त्यांना वगळण्यात आले.दुसरीकडे अजितदादांचे चिरंजीव पार्थ पवार या युवा व नव्या चेहऱ्याला,मात्र पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या जोडीने त्यात स्थान देण्यात आली.

दिल्ली विधानसभेच ७० जागा आहेत.त्यातील ३० राष्ट्रवादी लढत आहेत.तेथील उमेदवारांच्या नावांची घोषणा पक्षाने आज केली. त्यात चाळीस टक्यांहून जास्त म्हणजे १३ उमेदवार हे अल्पसंख्याक आहेत.दिल्लीत अल्पसंख्याक मतदार मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांनी ही खेळी खेळल्याचे समजले.पण,त्यातुलनेत भाजपचे बहूतांश उमेदवार हिंदू असून ते हिंदू कार्डच या निवडणुकीत चालविण्याची शक्यता आहे.दुसरीकडे मोठ्य़ा प्रमाणात मुस्लिम उमेदवार दिल्याने राष्ट्रवादीचे दिल्लीत खाते उघडणार का,हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.