उत्तम कुटे,संपादक
पिंपरीः कॉंग्रेसने आपल्या सत्ताकाळात देशाच्या संविधानात अनेकदा बदल करीत त्याचा अवमान केला.त्याचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात त्यांनी काम केले. त्याउलट भाजपने गेल्या दहा वर्षात संविधान आणि डॉ.बाबासाहेबांचा सन्मान केला,असा दावा केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी गुरुवारी (ता.१६) पुण्यात केला.भाजपच्या संविधान गौरव अभियानाच्या महाराष्ट्रातील पहिल्या सभेत ते बोलत होते.हे अभियान जनतेला प्रेरक ठरेल,असे ते म्हणाले.
ज्यांनी संविधानाची निर्मिती केली त्या डॉ.बाबासाहेबांविरोधात कॉँग्रेसने काम केले स्वार्थासाठी संविधानात अनेकदा दुरुस्त्या तथा बदल त्यांनी केला.आपले सरकार नसलेल्या राज्यात आणीबाणी लागू करून ती बरखास्त केली,असा हल्लाबोल सिंधिया यांनी केला.याउलट भाजपने मागील दहा वर्षात बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव केला.त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविले.त्यांचे संसदेत तैलचित्र लावले.त्यांच्या निवासस्थानांचे रूपांतर स्मारकात केले.अशाप्रकारे संविधान निर्माते आणि संविधानाचा विशेष गौरव केला.त्यामुळे आता कॉंग्रेसच्या संविधानविरोधी काळाचा अस्त झाला असून भाजपचा संविधान गौरव काल सुरू झाला आहे,असे ते म्हणाले.

या अभियानाचे प्रदेश संयोजक व विधान परिषद सदस्य अमित गोरखे प्रास्ताविकात त्याची माहिती दिली.यावेळी खासदार मेधा कुलकर्णी,अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष दिलीप कांबळे,आमदार (पुणे कॅन्टोमेंट)सुनील कांबळे,हेमंत रासने (कसबा),पुणे शहर भाजप अध्यक्ष धीरज घाटे,प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.