ओतूर येथील बाबीतमळ्यात पुन्हा बिबट्या जेरबंद

नारायणगाव ( किरण वाजगे,कार्यकारी संपादक)
ओतूर येथील बाबीतमळा शिवारात बुधवारी पहाटे दि.१५ रोजी बिबट्याला जेरबंद करण्यात ओतूर वनविभागाला यश आल्याची माहिती ओतूरचे वनपरीक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांनी दिली.

बाबीतमळा येथे बिबट्याचा वावर असल्याने, या ठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली होती.

mostbet

त्यानुसार येथील कपर्दिकेश्वर मंदिराच्या पाठीमागे बाबीतमळा येथील पिंपळगाव जोगे कालव्याच्या शेजारी गेली पंधरा दिवसापूर्वी उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस, ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाने पिंजरा लावला होता.

या ठिकाणी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये मंगळवार दि,१५ रोजी पहाटेच्या सुमारास, अंदाजे सात वर्षे वयाचा नर बिबट्या जेरबंद झाला असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांनी दिली.

हा बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती कळताच वनपाल सारिका बुट्टे,वनरक्षक विश्वनाथ बेले,दादाभाऊ साबळे,किसन केदार,गणपत केदार,फुलचंद खंडागळे,गंगाराम जाधव, प्रदीप तांबे सदर ठिकाणी पोहोचून पाहणी करून बिबट्याला माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे दाखल करण्यात आले.याकरीता मनोहर जाधव,गणेश खंडागळे,पोपट मालकर,तुकाराम गीते,सुरत सावंत,वैभव अस्वार,गणेश गीते,रमेश गीते,संदीप गीते,दीपक घुले,संपत पानसरे व इतर ग्रामस्थांनी सहकार्य केले.

ग्रामस्थांनी रात्री अपरात्री फिरत असताना व तसेच कामे करत असताना स्वतःची काळजी घेऊन कामे करावी, बिबट प्रवणक्षेत्रातून वाहनाद्वारे जात असताना जात असताना आपल्या वाहनाचे हॉर्न मोठयाने वाजवा,रस्त्याच्या बाजूला दबा धरून बसलेले वन्यप्राणी जेणेकरून त्यांची जागा बदलतील व आपले स्वतःचे संरक्षण होईल.शाळेतील लहान मुले शाळेत ये-जा करताना घोळक्याने ये-जा करावे किंवा आपल्या पाल्यासोबत ये-जा करावे.असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.