भाजप संविधान बदलेल म्हणणाऱ्या काँग्रेसने ते ७२ वेळा बदलले

देशात आणीबाणी लादून संविधानाचा अवमान सुद्धा केला

उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःविधानसभा निवडणुकीत पिंपरी-चिंचवडमधील तिन्ही जागा युतीने जिंकल्या.त्यातील महेश लांडगे (भोसरी) आणि शंकर जगताप (चिंचवड) या दोन भाजप आमदारांचा काल पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते निगडी-प्राधिकरणात सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांनी आपल्या ग्रामीण शैलीत विरोधकांचा व त्यातही कॉंग्रेसचा खरपूस समचाार घेतला.

लोकसभा निवडणुकीत भाजप संविधान बदलणार असल्याचा अप्रचार कॉंग्रेसने केला.प्रत्यक्षात त्यांनी आपल्या सत्ता काळात ७२ वेळा ते बदलले.देशात १९७५ ला आणीबाणी लादून संविधानाचा अवमानही केला,असा हल्लाबोल दानवेंनी यावेळी केला. एवढेच नाही,तर संविधानाते निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना लोकसभा निवडणुकीत दोन वेळा पाडण्याचे काम काँग्रेसने केले,अशी टीका त्यांनी केली.भाजप जातीयवादी असल्याच्या कॉंग्रेससह विरोधकांच्या दाव्याचे त्यांनी खंडन केले.अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना ममता बॅनर्जी त्यांच्या मंत्रीमंडळात होत्या.शरद पवार पूर्वी माझ्या प्रचाराला आले होते.त्यावेळी आम्ही जातीयवादी नव्हतो का,अशी विचारणा करीत आता मते मिळत नसल्याने विरोधकांना आम्ही तसे वाटू लागलो आहे. पराभवामुळे कार्यकर्ते पक्ष सोडून जाऊ नयेत म्हणून ते असे आरोप करीत आहेत,असे दानवे म्हणाले.

विधानसभा निकालानंतर जसा ईव्हीएमवर संशय घेतला गेला, तसा तो यापूर्वी ४५ वर्षात पाहिलेल्या व लढलेल्या निवडणुकांत घेतला गेला नाही,असे दानवे म्हणाले.विरोधक हरल्याने आता ते ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप करू लागले आहेत.आम्ही हरलो तेव्हा त्यांनी तो केला नाही,याकडे त्यांनी लक्ष वेधले.मालेगावमध्ये विधानसभेला ईव्हीएम घोटाळा झाला असा दावा ते का करीत नाही,असा सवाल त्यांनी केला.पराभवाचे कारण ते शोधत आहेत,असे ते म्हणाले.शहरातील दोघांपैकी एका भाजप आमदाराला मंत्री करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.त्यावर आ.लांडगे,जगताप यांच्याकडे पाहत पक्षात धक्कादायक निरोप येतात.त्यामुळे कपडे शिवून ठेवा,अचानक निरोप येवू शकतो,असे ते म्हणाले.परिणामी शहराला पहिल्यांदाच मंत्रीपद मिळण्याच्या शक्यतेने उपस्थित आनंदून गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *