मारकडवाडीकरांचा मुद्दा झाला थेट लोकसभेत उपस्थित

खासदार कोल्हेंच्या प्रभावी भाषणाने पुन्हा घेतल्या टाळ्या उत्तम कुटे,संपादकपिंपरीः गेल्या महिन्यात विधानसभा निवडणुकीचा अनपेक्षित असा निकाल आला.त्यावर अजून उहापोल सुरु आहे.त्यातून ईव्हीएमवर शंका घेतली गेली.सोलापूर जिल्ह्यातील मारक़डवाडीने,तर बॅलेट पेपरवर मतदानाची तयारी केली.पण,प्रशासनाने ती होऊ दिली नाही.हाच मुद्दा शिरुरचे शरद पवार राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी काल लोकसभेत उपस्थित केला.त्यांच्या या प्रभावी भाषणाला टाळ्या पडल्या.…

खासदार कोल्हेंच्या प्रभावी भाषणाने पुन्हा घेतल्या टाळ्या

उत्तम कुटे,संपादक
पिंपरीः गेल्या महिन्यात विधानसभा निवडणुकीचा अनपेक्षित असा निकाल आला.त्यावर अजून उहापोल सुरु आहे.त्यातून ईव्हीएमवर शंका घेतली गेली.सोलापूर जिल्ह्यातील मारक़डवाडीने,तर बॅलेट पेपरवर मतदानाची तयारी केली.पण,प्रशासनाने ती होऊ दिली नाही.हाच मुद्दा शिरुरचे शरद पवार राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी काल लोकसभेत उपस्थित केला.त्यांच्या या प्रभावी भाषणाला टाळ्या पडल्या.

हॉटेलात गेलो,तर व्हेज खायचे की नॉन व्हेज हा पर्याय आपल्याला असतो,तसाच तो ईव्हीएम की बॅलेट पेपर हा मतदारांनाही का नको अशी विचारणा खा.कोल्हेंनी केली. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत अनेक मतदारांना आपले मत हरवले वा चोरीला गेल्याचा संशय आहे.पण, दरोगा (निवडणूक आयोग) तसं काही झालं,असं मानायला तयारच नाही,असा टोला त्यांनी लगावली.त्यावर विरोधी खासदारांनी शेम शेम असे म्हणत त्यांना प्रतिसाद दिला.,तर,सत्ताधाऱ्यांनी काहीसा व्यत्यय आणण्याचा प्रयत्न झाला.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी काळात जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशातील मतदारांना आपले मत गेले कुठे हे कळाय़ला हवे,तशी व्यवस्था व्हायला हवी,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मारकडवाडी ग्रामस्थांनी आपले मत गेले कुठे हे जाणून घेण्यासाठी मतदान पत्रिकेवर (बॅलेट पेपर) मतदान घेण्याची मागणी केली.त्यांचा ना निवडणुकीवर अविश्वास होता ना निकालावर.तेथे,तर उमेदवार विजयी झाला आहे.पण,आपले मत गेले कुठे म्हणू त्यांनी बॅलेट पेपरची मागणी केली होती.पण,त्याला निवडणूक आयोग तथा प्रशासनाने नकार दिला.तेथेच शंकेची पाल चुकचुकली,असे .खा. कोल्हे म्हणाले.एकूण मतदानाच्या पाच टक्के मतांची पडताळणी व्हीव्हीपॅट आणि बॅलेट युनीटव्दारे करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने देऊनही निवडणूक आयोग ती करीत नाही.त्यामुळे संशय आणखी बळावतो आहे.कर नाही,त्याला डर कशाला,काही केलं नाही,तर घाबरता का,हातच्या कंकणाला आरसा कशाला,असा सवाल त्यांनी केला. ईव्हीएम लॉक डाटा उमेदवारांना देण्याची मागणीही त्यांनी आय़ोगाला केली.लोकसभा निवडणुतीनंतर वाढलेली लाखो मतदारांची यादीही विरोधी पक्षांना आय़ोगाने दिली नाही,ही बाब संशयास्पद आहे.त्यामुळे काही लपविण्याचा प्रयत्न होतो आहे का,डाल में कुछ काला है,या पुरी डाल काली है,असा संशय निर्माण होतो आहे,असे ते म्हणाले.परिणामी निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास वाढण्यासाठी ५ टक्के ईव्हीएमच्या मॉकपॉलऐवजी तेवढ्या मतांच्या व्हीव्हीपॅट पडताळणीची गरज त्यांनी प्रतिपादित केली.निवडणूक प्रक्रियेवरील लोकांचा विश्वास वाढविण्यासाठी ती पारदर्शक करण्याची मागणी त्यांनी केली.