बिबट्यापासून सुरक्षेसाठी मेंढपाळांना जुन्नर वन विभागामार्फत ४०० सौर दिवे आणि तंबूचे वाटप

नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
जुन्नर वनविभाग हद्दीमध्ये बिबट्यांची दिवसेंदिवस वाढती संख्या लक्षात घेता बिबट्या पासून नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी घरगोठ्यांभोवती सौर कुंपण, नेक बेल्ट इत्यादी अनेक उपाययोजना वन विभागामार्फत राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून उघड्यावर झोपणा-या मेंढपाळाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे पाहून उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सौर दिवे आणि तंबूचे नुकतेच वाटप करण्यात आले.
वन विभागाने हे सुरक्षिततेचे पाऊल तात्काळ उचलले असून जुन्नर वनविभागातील शासकीय निधी उपलब्ध करत मेंढपाळांना राहण्यासाठी ४०० सौर दिवे आणि ४०० तंबू खरेदी केले असून मेंढपाळांना वाटप करण्यात येत आहेत.
सौर दिवे आणि तंबूमुळे बिबट हल्ला,सर्पदंश तसेच पाऊस व थंडी यापासून मेंढपाळांचे संरक्षण होण्यासाठी मदत होईल असे वनपरीक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांनी सांगितले.


आज दिनांक ६ डिसेंबर रोजी आळे, पिपंरी पेंढार, उंब्रज, वडगांव आनंद, बेल्हे, निमगाव सावा, मंगरूळ, पारगाव तर्फे आळे, शिरोली तर्फे आळे, सुलतानपूर, येडगाव, खोडद, हिवरे तर्फे नारायणगाव, वडगांव कांदळी, येथील वास्तव्यास असलेल्या शिवराम बुधा करगळ, लालु पांगरु पोकळे, अविनाश बंडु तांबे, गोरेक बाबाजी कोळेकर, काळूराम गजानन करगळ, रोहिदास धुळा करगळ,.साळू राम धुळा करगळ, बाळु साळू राम क-हे, गंगा राम महादू क-हे, हनुमंत पोपट माने, शिवाजी बाळु कोळेकर, सुनील पुना कोकरे, वसंत लक्ष्मण चक्कर, नारायण बाळु कोळेकर, तुकाराम महादू करे, सहादू पावसु खरात, पांडुरंग बाबाजी देवकर, भास्कर खंडू दुबे, काळूराम नाथा घुले, अंकुश तुळशीराम जानक, किसन भाऊ साहेब चीतळकर, संतोष तुकाराम तोंडे, चिमाजी भागु सोनार, दामु हिरामण खरात, भानुदास बुधा करगळ व इतर अशा एकुण ५५ मेंढपाळांना पहिल्या टप्प्यात सौर दिवे व तंबूचे वाटप अमोल सातपुते यांच्या हस्ते करणेत आले.
सौर दिवा कशा प्रकारे वापरावा तसेच तंबू कसा लावावा व तो जास्तीत जास्त कसा टिकेल याचे प्रात्यक्षिक वनरक्षक कैलास भालेराव , वनपाल संतोष साळुंके, व विशाल गुंड यांनी करून दाखवले यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी निकिता बोटकर , रेस्क्यू टीम मेंबर संतोष कुतळ, रोशन भोर, रवी केदार, खंडू वामन आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *