वयाच्या९६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
पद्मश्री डॉ.मनोहर कृष्णाजी डोळे (बाबा) यांचे आज दुपारी ०१ .३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९६ वर्षांचे होते.सुमारे ५० वर्षांपूर्वी स्व. मोहन ठुसे नेत्र रुग्णालयाच्या माध्यमातून तसेच स्वतः वैयक्तिक आपल्या वैद्यकीय सेवेमधून नारायणगाव वारूळवाडी व इतर परिसरात रुग्णांची सुश्रुषा करणारे डॉक्टर मनोहर डोळे यांना नुकतेच पद्मश्री पुरस्काराने राष्ट्रपतींनी गौरवले होते.
ग्रामीण भागात खेडोपाडी जाऊन रुग्ण सेवा करत असतानाच मोहन ठुसे नेत्र रुग्णालय तसेच डॉक्टर मनोहर डोळे फाउंडेशन च्या माध्यमातून त्यांनी उत्कृष्ट सेवा बजावली. याशिवाय हजारो गोरगरीब,ज्येष्ठ नागरिक व नेत्र रुग्णांची अल्प मोबदल्यात सेवा केली.
अंत्यविधी आज रात्री ०९. ०० वाजता जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील मीना नदीच्या तीरावर होईल.
ईश्वर कै.बाबांच्या आत्म्यास चिरशांती देवो. आपला आवाज न्यूज नेटवर्क परिवाराच्यावतीने पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

