मतविभागणीतून होतोय जुन्नरचा आमदार

तिरंगी लढतीत शरद सोनवणेंची रिक्षा सूसाट

उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःजुन्नर विधानसभा मतदारसंघातून युतीतील शिंदे शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार शरद सोनवणे हे निवडून आले. बहूरंगी लढतीचा फायदा त्यांना झाला. त्यांनी य़ुतीतील राष्ट्रवादीचे उमेदवार आणि विद्ममान आमदार अतुल बेनके यांचा सहा हजार ६६४ मतांनी पराभव केला.मतविभागणीतून जुन्नरचा आमदार होतो,हे गेल्या काही टर्मचे समीकरण पुन्हा खरे झाले. शेरकर आणि बेनके एकत्र न राहिल्याचा सोनवणेंचा लाभ झाला.

यावेळी पाच प्रमुख उमेदवार जुन्नरला रिंगणात होते. त्यामुळे ती लढत बहूरंगी म्हणजे पंचरंगी होईल,असे वाटले होते.प्रत्यक्षात ती गेल्यावेळेसारखीच तिरंगी झाली.२०१९ सारखाच मतविभागणीतून आमदार मिळाला.त्यावेळी सोनवणे शिवसेनेचे,आशा बुचके अपक्ष,तर अतुल बेनके राष्ट्रवादीचे उमेदवार होते.बेनकेंनी सोनवणेंचा नऊ हजार ६८मतांनी पराभव केला.तर,बुचके यांनी पन्नास हजार ४७ एवढी मते घेतली.मतविभागणीची फायदा बेनकेंना झाला होता.तो यावेळी सोनवणेंना झाला.तसेच त्यांनी गेल्या पराभवाची परतफेडही केली.ते दुसऱ्यांदा आमदार झाले. राज्यात जे दोन अपक्ष निवडून आले,त्यातील एक ते आहेत.

खेळाडू तेच, लढत नवी असे २०१४ पासून २०२४ पर्यंत जुन्नरमध्ये होत आहे. २०१४ला सोनवणेंनी बुचकेंचा १६ हजार ९२३ मतांनी पराभव केला होता.बेनकेंना चाळीस हजार ५७० मते मिळाली होती.त्यावेळी सोनवणे पहिल्यांदा मनसेकडून निवडून आले. त्यावेळी ते मनसेचे राज्यातील एकमेव आमदार होते.२०१४,२०१९,२०२४ च नाही,तर २००९ च्या लढतीतही बुचकेंचा पराभव झालेला आहे.त्यांना यावेळी,मात्र खूपच कमी म्हणजे नऊ हजार ३४६मते पडली.त्यांच्यापेक्षा वंचित बहूजन विकास आघाडीचे देवराम लांडे यांनी जास्त म्हणजे २२ हजार १९ मते घेतली.आघा़डीतील राष्ट्रवादीचे शेरकर दुसऱ्या,तर बेनके तिसऱ्या नंबरवर राहिले.गेल्यावेळी शेरकर व बेनके एकत्र होते,तेव्हा बेनकेंचा विजय झाला होता.यावेळी ते वेगळे झाल्याचा त्या दोघांनाही फटका बसला.या दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा (सोनवणे) लाभ झाला.त्याजोडीने सोनवणेंचा शिवजन्मभूमीत तीन दिवस शिवजयंती साजरी करण्याचा उपक्रम व जुन्नरच्या विकासाचे स्वप्न जुन्नरकरांना भावले. त्यामुळे जनमत त्यांच्या बाजूने झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *