उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःविधानसभेचा निकाल काल आला.त्यानंतर आज युतीतील राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक मुंबईत झाली.त्यात अजित पवार यांनी आपले कट्टर समर्थक आमदार मावळचे सुनील शेळके यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीच्या वेळचा किस्सा रंजकपणे सांगितला.त्यावर बैठकीत मोठा हशा पिकला.
मावळमधून शेळके पुन्हा एक लाख आठ हजार ५६५ एवढ्या निवडून आले आहेत.पण,त्यांच्या पक्षातील बंडखोर अपक्ष बापूसाहेब भेगडेंच्या मागे मावळ भाजपच नाही,तर आघाडीनेही ताकद उभी केल्याने या मावळ पॅटर्नमळे सीट जाणार असे त्यांना वाटले होते.ती भीती त्यांनी अजितदादांनाही बोलून दाखवली होती.तोच संदर्भ घेत या सभेत अजितदादांनी शेळकेंची खास ओळख करून दिली.ती देताना मोदी भेटीचा किस्सा आपल्या स्टाईलने सांगितला. विधानसभा निवडणूक प्रचारासाठी मोदींची पुण्यात या महिन्याच्या १२ तारखेला सभा झाली होती. त्यावेळी सर्व आमदारांना आत घेतले.शेळके बाहेरच राहिले. म्हणून अजितदादांनी खास मोदींना सांगून त्यांना आत घेतले.त्यामुळे त्यांची मोदींशी स्वतंत्र ओळख करून देण्यात आली. तोच फोटो त्यांनी भाजप मावळात भाजप पूर्ण विरोधात असल्याने व्हायरल केला,असे अजितदादा म्हणताच उपस्थित इतर आमदारांत हशा पिकला. भाजपसह आघा़डीनेही बंडखोर अपक्ष उमेदवार भेगडेंना पाठिंबा दिल्याने आता माझी सीट गेली, अशी भीती शेळकेंनी अजितदादांकडे व्यक्त केली होती. ती आठवण सांगत माझी सीट गेली सांगणारा मतदानाच्या दिवशी, मात्र म्हणतो एक लाखाच्या लीडने निवडून येणार असे अजितदादांनी कपाळावर हात मारून सांगताच पुन्हा हशा झाला.तेथे बाजूला उभे असलेले प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी,तर शेळकेंचा गालगुच्चा घेतला.इतर उपस्थित नेत्यांनी सुद्धा शेळकेंचे अभिनंदन केले.आपल्यापेक्षा जास्त लीडने आल्याबद्दल अजितदादांनी शेळकेंचे खास कौतूक केले.दरम्यान,हा काहीसा नर्म विनोदी व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे.