चिंचवड विधानसभेत महायुतीचे शंकर जगताप यांचा एक लाखापेक्षा जास्त मताधिक्याने विजय

चिंचवडला पुन्हा जगताप कुटुंबातीलच आमदार

उत्तम कुटे,संपादक

पिंपरीःयुतीतील भाजपचे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार शंकर जगताप हे एक लाखाहून अधिकच्या लीडने विजयी झाले.त्यातून पाचव्यांदा चिंचवडला जगताप आमदार झाले. यापूर्वी शंकर जगतापांचे मोठे बंधू लक्ष्मण जगताप तीनदा, तर भावजय अश्विनी जगताप या एकदा आमदार झालेल्या आहेत.त्यांच्या चार निवडणुकीचे व्यवस्थापन शंकर जगतापांनी यशस्वीरित्या केल्याचे कसब त्यांना स्वतला निवडून येण्यातही कामी आले.

चिंचवडवरील जगताप कुटुंबाच्या असलेल्या वर्चस्वाचा मोठा हातभार तेथील युतीच्या विजयाला लागला.लाडक्या बहिणींनी मोठी साथ दिली.लक्ष्मण जगतापांनी आपल्या काळात केलेली कामे,त्यामुळे शहराचा बदललेला चेहरामोहरा, एकेकाळी गावखेडे असलेल्या पिंपळे गुरव,सांगवीला त्यांनी केलेले स्मार्ट सिटी यामुळेही शंकर जगताप यांचा रेकॉर्डब्रेक विजय झाला. आतापर्यंतचे एवढे लाखाचे लीड त्यांचे बंधू आणि भावजय म्हणजे आतापर्यंतच्या तेथील कुठल्याही आमदाराला मिळाले नव्हते.आपल्या विरोधकांची शंकर जगतापांनी बांधलेली यशस्वी मोट,त्यांना लगेच पदेही दिल्याने त्यांच्याविरुद्धचा पूर्ण विरोध मावळला.परिणामी त्यांच्यामुळे राजीनामा दिलेले माजी नगरसेवक संदीप कस्पटे,राम वाकडकर यासारखी मंडळी थेट त्यांच्या प्रचारात उतरली.त्याचा मोठा फायदा झाला.चिंचवडमधून इच्छूक असल्याने राजीनामा दिलेले माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांचीही समजूत काढण्यात त्यांना यश आले.त्यांचे जावई राज तापकीर यांना त्यांनी भाजयुमो चे शहराध्य़क्ष केले.तर,दुसरे इच्छूक शत्रूघ्न ऊर्फ नाना काटे या ज्येष्ठ नगरसेवकाला थेट शहर भाजपचे कार्यकारी अध्यक्ष केल्याने त्यांचीही नाराजी दूर झाली.पण,सगळ्यात टर्निंग पॉईंट ठरला तो नाना काटेंना त्यांनी आपल्याकडे वळवला तो.गेल्य़ावर्षीच्या चिंचवड पोटनिवडणुकीत लाखभर मते घेतल्याने ते यावेळी पुन्हा अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते.पण,दोन पावले मागे घेत शंकर जगताप हे थेट नानांच्या घरीच गेले.त्यापूर्वी अजितदादांनीही नानांची घरी जाऊन भेट घेतली होती.परिणामी नानांनी आपली तलवार म्यान केली अन ते शंकर जगतापांच्या पाठी खंबीरपणे उभे राहिले.

पक्षासह युतीतील विरोधकांना शंकर जगतापांनी शांतच केले नाही,तर त्यांना प्रचारातही उतरविले.त्यानंतर त्यांनी बुद्धीबळाची चाल केली. चिंचवडमध्ये आघाडीची उमेदवारी मिळविण्यासाठी युतीतील राष्ट्रवादीतून ठाकरे शिवसेनेत गेलेले ज्येष्ठ माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनाच त्यांनी यशस्विरित्या गळाला लावले.त्यांना प्रचारातच उतरवले.त्यातून त्यांनी दहा हजारापेक्षा जास्त मतांची बेगमी केली. अशारितीने त्यांनी एकेक कडी जुळवित विजयाची माळ तयार केली.त्यातून पहिल्यांदाच आमदार होऊनही लगेच त्यांच्या मंत्रीपदाची मागणी मतदारसंघातून झाली.ते,जर त्यांना वा शहरातही शत प्रतिशत युतीचे आमदार झाल्याने बाकीच्या दोघांपैकी एका आमदाराला,जरी मिळाले,तरी त्यातून शहराला प्रथमच ही संधी मिळणार आहे,हे ही नसे थोडके.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *