मावळ तालुक्यात विधानसभेच्या निकालाआधीच प्रचंड खळबळ
पिंपरीःमावळ तालुक्यातील प्रसिद्ध गाडामालक पंडीत रामचंद्र जाधव (वय ५२,रा.जाधववाडी,नवलाख उंब्रे,ता.मावळ) यांचा अपहरण करून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना नुकतीच घडली.यामुळे मावळात मोठी खळबळ उडाली होती. शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने हुषारीने हा गुन्हा उघडकीस आणून त्यात जाधव यांचा भाडेकरू आणि त्याचा परप्रांतीय साथीदार अशा दोघांच्या मुसक्या आवळल्या.जाधव यांचा खून केल्यानंतर त्यांच्याच मोबाईलव्दारे आऱोपी त्यांच्याच नातेवाईकांकडे आरोपी पन्नास लाखांची खंडणी मागत होते.

सुरज मच्छिंद्र वानखेडे (वय २३,रा.जाधव यांच्या खोलीत,जाधववाडी) आणि रणजितकुमार(रा. बिहार) अशी आरोपींची नावे आहेत. वानखेडे हा छोटा बांधकाम ठेकेदार असून ऱणजितकुमार हा मजूर आहे.त्यांनी खूनानंतर खंडणीचा बनाव रचल्याचे दिसून आले.त्यामुळे या गुन्ह्यामागे वेगळेच कारण असल्याचा संशय आहे. ते अद्याप पोलिसांना समजलेले नाही.आरोपींना ते आज न्यायालयात हजर करणार आहेत. त्यांची पोलिस कोठडी मिळताच तपासात कारण समजेल,असे पोलिसांनी सांगितले.
जाधव यांचा आरोपींनी गळा आवळून खून केला.नंतर त्यांचा मृतदेह जाळून टाकला. हा गुन्हा त्यांना पचलाही असतात.पण, नंतर त्यांनी जाधव यांच्याच मोबाईलवरून त्यांच्याा कुटुंबाला पन्नास लाखांच्या खंडणीसाठी मेसेज केले.तेथेच ते अडकले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मुख्य आरोपी वानखेडेचे लोकेशन शोधले.त्याला संशयावरून ताब्यात घेतले.परंतू, समाधानकारक उत्तर त्याला देता आले नाही.पोलिसांनी खाक्या दाखवताच,मात्र तो पोपटासारखा बोलू लागला.त्याने आपला साथीदार रणजितकुमार ( रा.बिहार) याच्या मदतीने जाधवांचा खून केल्याचे सांगितले.खूनानंतर त्यांनी जाधव यांची फॉर्च्यूनर त्यांनी मोटार मागवली आहे,असे त्यांच्या घरच्यांना सांगत ती मागवून घेतली.त्यात जाधव यांचा मृतदेह टाकून त्यांनी तो खेड तालुक्यातील वहागाव येथील डोंगरावर नेला.तो जाळून टाळत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नही केला होता.
दरम्यान,१४ तारखेपासून जाधव बेपत्ता झाल्याने त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेतली.दरम्यान,जाधवांच्या नातेवाईकांना पन्नास लाखाच्या मागणीचे मेसेज येण्यास सुरुवात झाली होती.त्यावरून पोलिसांनी तपास सुरु केला.सीसीटीव्ही फूटेज आणि मेसेज आलेल्या जाधव यांच्या फोनचे लोकेशन शोथत ते पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीपर्यंत पोचले.पोलिसांच्या खंडणीविरोधी व औद्योगिक तक्रार निवारण पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण व त्यांच्या पथकाने अत्यंत हुषारीने हा खळबळजनक गुन्हा उघडकीस आणला.त्याबद्दल त्यांचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी कौतूक केले आहे.

