दुपारपर्यंत राज्यात पुणे जिल्हा मतदानात सर्वात मागे, निम्मे मतदान करीत नक्षलग्रस्त गडचिरोली सर्वात पुढे
उत्तम कुटे
पिंपरीःसकाळीच अपेक्षित असलेले मतदान पिंपरी.चिंचवड,भोसरीत झालेच नाही.दुपारपर्यंतही त्याला वेग आला नाही.आता सायंकाळी सहा वाजता संपेपर्यंत,तरी समाधानकारक ते होईल,अशी आशा आहे.दरम्यान,पुणे जिल्ह्यात दुपारी तीन वाजेपर्यंत ४१.७० टक्के मतदान झाले.दुसरीकडे राज्यात दुपारी एकपर्यंतच नक्षलग्रस्त गडचिरोली सर्वात जास्त(५०.८९ टक्के ते झाले होते.
पहिल्या काही तासांत तरुणाई मोठ्या संख्येने मतदान करताना दिसली नाही.त्यातुलनेत ज्येष्ठ,दिव्यांग आणि महिलांचा उत्साह अधिक दिसून आला.पहिल्या आठ तासांत दुपारी तीन वाजेपर्यंत सर्वात जास्त मतदान मावळ मतदारसंघात ४९.७५ म्हणजे निम्मे झाले होते.त्यानंतर आंबेगाव दुसऱ्या (४९.५५),तर जुन्नर तिसऱ्या क्रमांकावर (४९.२९) होता.सर्वात कमी मतदान पिंपरीत अवघे ३१.५८ टक्के एवढेच झाले.उद्योगनगरीतील तीनपैकी सर्वात जास्त भोसरीत ४३.१६,तर चिंचवडला ४०.४३टक्के झाले.खेड-आळंदीत हा टक्का ४७.४३, शिरूरला ४३.६० होता.
उद्योगनगरीत काही मतदान केंद्रावर सकाळपासून रांगा दिसल्या.तर,काही ठिकाणी,मात्र तुरळक गर्दी आढळली.शहरातील खासदार (मावळ)श्रीरंग बारणे, आमदार (चिंचवड)अश्विनी चिंचवडे,महेश लांडगे (भोसरी),अण्णा बनसोडे,(पिंपरी),अमित गोरखे, उमा खापरे (दोघेही विधानपरिषद सदस्य), पिंपरी-चिंचवड महापालिका आय़ुक्त तथा प्रशासक शेखरसिंह, पोलिस आय़ुक्त विनयकुमार चौबे, यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला.भोसरी,पिंपरी,चिंचवड या तिन्ही मतदारसघातील आघाडी व युतीचे उमेदवार अजित गव्हाणे, महेश लांडगे, सुलक्षणा शिलवंत-धर, अण्णा बनसोडे,राहूल कलाटे, शंकर जगतापांसह इतर सर्व उमेदवारांनीही लवकरच मतदान केले. ते करताना इतरांनीही मतदान करण्याचे आवाहन वरील लोकप्रतिनिधी,उमेदवार आणि मान्यवरांनी केले.