उत्तम कुटे,संपादक
पिंपरीः राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता गेल्या महिन्याच्या १५ तारखेला लागली. त्यापासून आतापर्यंत राज्यात निवडणुकीशी सबंधित ५३२ गुन्हे नोंद झाले.त्यात सर्वाधिक २१० हे आचारसंहिता भंगाचे,तर ६३ हे सोशल मिडिय़ा,तर उर्वरित २५९ इतर बाबींशी संबंधित आहेत.
नाशिकमध्ये सर्वाधिक ४९ हे गुन्हे नोंद झाले असून त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्याचा नंबर (४८) लागतो.तर, दुसरे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये हा आकडा २९ आहे.मात्र,माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात तो एकही दाखल झालेला नाही,हे विशेष.इतर जिल्ह्यातील ही संख्या अशीः
१) मुंबई शहर व मुंबई उपनगर : ३६
२) ठाणे : ३८
३) पालघर : ०५
५) धुळे : ०१
६) बीड : १८
७) अहिल्यानगर : ३२
८) पुणे : ४८
९) छत्रपती संभाजीनगर : २५
१०) जालना : १०
११) जळगाव : १०
१२) नंदुरबार : ०३
१३) कोल्हापूर : २६
१४) रत्नागिरी : १०
१५) सातारा : १५
१५) सांगली : ०८
१७) सोलापूर : २८
१८) लातूर : १२
१९) धाराशिव : ०६
२०) रायगड : १९
२१) परभणी : ०७
२२) नांदेड : १५
२३) हिंगोली : १२
२४) यवतमाळ : ०७
२५) वाशिम: ०३
२६) वर्धा : ०६
२७) अमरावती : १७
२८) अकोला : ०२
२९) बुलढाणा : ०८
३०) चंद्रपूर : ०३
३१) गडचिरोली : ०६
३२) भंडारा : १५
३३) गोंदिया : ०३
३४) नागपूर : २९

