उद्याच्या मतदानासाठी पुणे जिल्ह्यातील मतदान केंद्र आणि प्रशासनही आजच झाले सज्ज

उत्तम कुटे,संपादकपिंपरीःउद्याच्या मतदानासाठी पुणे जिल्ह्यातील मतदान केंद्र आणि प्रशासन आजच सज्ज झाले.जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात ८ हजार ४६२ मतदान केंद्र असून त्यात मावळचे संवदेनशील आहे.या सर्वच ठिकाणी ईव्हीएम वाटप आज पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. जिल्ह्यात ६ हजार ५९४ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची सुविधा आहे. ६० गृहनिर्माण संस्थांमध्ये…

उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःउद्याच्या मतदानासाठी पुणे जिल्ह्यातील मतदान केंद्र आणि प्रशासन आजच सज्ज झाले.जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात ८ हजार ४६२ मतदान केंद्र असून त्यात मावळचे संवदेनशील आहे.या सर्वच ठिकाणी ईव्हीएम वाटप आज पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

जिल्ह्यात ६ हजार ५९४ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची सुविधा आहे. ६० गृहनिर्माण संस्थांमध्ये १२६,तर झोपडपट्टी भागात २६७ मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यात प्रत्येकी २१ मॉडेल, युनिक, महिला,दिव्यांग, युवा संचलित, तर ९६ परदानशीन मतदान केंद्र असून १ हजार ५०० मतदान केंद्रावर पाळणाघरांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इंदापूर भोर मावळ व शिवाजीनगर हे मतदान केंद्र संवेदनशील मतदान केंद्र आहेत.चिंचवड,इंदापूर, बारामती, पुरंदर, वडगाव शेरी, हडपसर आणि पुणे कॅन्टोन्मेंट या ७ विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची संख्या १६ पेक्षा अधिक असल्यामुळे तेथे दोन बॅलेट युनिट म्हणजे मतदान यंत्र (ईव्हीएम),तर उर्वरित १४ ठिकाणी विधानसभा ते एकच वापरण्यात येणार आहे.९१ टक्के मतदार ओळख चिठ्ठ्या म्हणजे व्होटर स्लिपा वाटल्याचा मोठा दावा जिल्हा प्रशासनाने केला.

जिल्ह्यात ८८ लाख ४९ हजार ५८५ मतदार असून त्यापैकी ४५ लाख ७९ हजार २१६ पुरुष तर ४२ लाख ६९ हजार ५६९ महिला आहेत. सर्वाधिक ६ लाख ६३ हजार ६२२ मतदार चिंचवड विधानसभा मतदारसंघात तर सर्वात कमी २ लाख ८३ हजार ६३५ इतके कसबा पेठ मध्ये आहेत.जुन्नर मतदार संघात ३ लाख २५ हजार ७६४, आंबेगाव मतदार संघात ३ लाख १४ हजार २५२, खेड आळंदी ३ लाख ७६ हजार ६२३, शिरूर ४ लाख ६६ हजार ४२, मावळ ३ लाख ८६ हजार १६७, पिंपरी ३ लाख ९१ हजार ६०७, भोसरी ६ लाख ८ हजार ४२५ मतदारांची संख्या आहे.