भोसरीत तुतारी अशी वाजवा की कमळाची एकही पाकळी शिल्लक राहता नये
उत्तम कुटे,संपादक
पिंपरीः भोसरीचे आघाडीतील राष्ट्रवादीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारासाठी स्थानिक खासदार शिरुरचे डॉ.अमोल कोल्हे यांची चिखलीत रविवारी (ता.१७) रात्री जाहीर सभा झाली.त्यात त्यांनी गव्हाणेंचे प्रतिस्पर्धी युतीतील भाजपचे उमेदवार महेश लांडगे व यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर तुफान टीका केली.योगींच्या बटेंगे तो कटेंगे या नाऱ्याला त्यांनी बचेंगे तो और भी लढेगें, झुजेंगे और जितेंगे भी,असे सणसणीत उत्तर दिले.तर भोसरीत अशी तुतारी वाजवा की कमळाला एकही पाकळी शिल्लक राहता नये,असे म्हणत लांडगेंवर कडक हल्लाबोल केला.
आपल्या अवघ्या दहा मिनिटांच्या भाषणात खा.कोल्हेंनी सभेचे रुपच पालटून टाकले.दररोज रात्री दहा वाजता प्रचार बंद होतो.खा. कोल्हेंचे त्यापूर्वी फक्त दहा मिनिटे अगोदर सभास्थानी आगमन झाले.पण,या अल्प वेळेत त्यांनी जोरदार बॅटिंग केली.आज भोसरीत योगींची सभा झाली.त्यात त्यांनी अपेक्षेनुसार बटेंगे तो कटेंगे ही आपली घोषणा दिली.तिचा समाचार घेताना बंटेंगे तो कटेंगे हे विष गंगा,यमुनेच्या खोऱ्यात उगवते,इकडे महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कातळात,मात्र बचेंगे तो और भी लढेंगे आणि झुजेंगे और जितेंगे अशा घोषणा होतात,असे कोल्हे म्हणाले.तसेच कॉंग्रेस राजवटीत देशाचा नाही,तर फक्त गांधी घराण्याचा विकास झाला,अशी टीका योगींनी केली होती.त्याचा तसाच खरपूस समाचार घेताना त्यांनी भोसरीतही फक्त एकाच कुटुंबाचा विकास झाला,असे नाव न घेता आ.लाडंगे कुटुंबावर हल्लाबोल केला. १८४ सातबारे यांनी केले असे सांगत त्यांनी त्याची चवडच दाखवली.त्यामुळे भोसरी वाचवा,सातबारा वाचवा,अशी घोषणा कोल्हेंनी दिली.
आ. लांडगेंवरील कडाडून हल्लाबोल सुरुच ठेवताना स्वताला भगवेधारी म्हणणारे इतके भ्रष्टाचारी असतील असे वाटते नव्हते, असे खा.कोल्हे म्हणाले.पूर्वी बकासूराला गाडाभर अन्न लागायचे,आता भोसरीतील या वृत्तीला भंगार,कचरा,प्लॅस्टिक,टेंडर असे सारेकाही चालतं,अशी कडवट टीका त्यांनी केली.वीस तारखेनंतर बघून घेतो,या आ.लांडगे यांनी जाहीर सभेत नुकत्याच दिलेल्या धमकीवर बोलताना उतू नका,मातू नका, गर्वाचे घर खाली झाल्याशिवाय राहत नाही,असे आपल्या भाषेत आणि स्टाईलमध्ये त्यांनी सुनावले.महाराष्ट्रात दररोज आठ शेतकरी आत्महत्या करीत आहे हा कसला विकास, उद्योग राज्याबाहेर जाऊन रोजगार हिरावले जात आहेत हा कसला विकास अशी घणाघाती टीका त्यांनी युती सरकारवर केली.विकासावर बोलता येत नाही म्हणून त्यांनी लाडकी बहिण योजना आणली.पण ते एका हाताने देताना दहा हाताने काढून घेत आहे,याकडे त्यांनी लक्ष वेधले.चाय पे शुरु होई चर्चा,गाय पे अटक गई,असा टोलाही लगावला.बरोबर दहाच्या ठोक्याला त्यांनी भाषण थांबवले.