चिंचवड,प्रतिनिधी
पिंपरी विधानसभा मतदार संघात विरोधी पक्षाच्या महायुतीच्या उमेदवारांच्या पायाखालची वाळू घसरू लागले असल्याचे चित्र दिसून दिसून आले. आज या परिसरात पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी प्रचार फेरीचे आयोजन केले होते. यावेळी विरोधकांच्या काही कार्यकर्त्यांनी थोडासा गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला परंतु अतिशय शांत व संयमी असलेल्या डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी तितक्याच शांततेने परिस्थिती हाताळली.
या प्रचार फेरी दरम्यान सुलक्षणा शिलवंत यांनी आनंद नगर येथील सम्यक बौद्ध विहारामध्ये जाऊन बुद्ध प्रतिमेस अभिवादन केले.
शांतता व अहिंसेचा संदेश गौतम बुद्ध यांनी दिला आहे. मात्र या आनंद नगर मध्ये शांतता भंग करण्याचा व या परिसरातील आनंद हिरावून घेण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाचे उमेदवार यांनी आजवर केला आहे. सुलक्षणा शिलवंत धर यांनी यावेळी गौतम बुद्ध यांच्यासमोर या आनंद नगर परिसरामध्ये आनंद नांदावा म्हणून आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे अभिवचन दिले व तशी बुद्ध चरणी प्रार्थना केली.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सुलक्षणा शिलवंत यांनी आज चिंचवड स्टेशन परिसरात आपली प्रचार फेरी आयोजित केली होती यादरम्यान त्यांनी आनंदनगर भागात प्रचारासाठी आले असताना येथील महिला वर्गाने त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. घराघरात त्यांना औक्षण करण्यात आले ज्येष्ठांनी आशीर्वाद दिले. येथील दुर्गा माता मंदिरात देखील सुलक्षणा शिलवंत यांनी जाऊन प्रार्थना केली.