अजितदादांच्या हेलिकॉप्टरमधील बॅगेत चकल्या,तर आठवलेंच्या पिशवीत सुखी भेळ
उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःविधानसभा निवडणुकीत प्रथम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हेलिकॉप्टरची तपासणी झाली.त्यानंतर त्यांनी बॅगा नाही,तर आपल्या युरीन पॉटचीही चेकिंग का केली नाही,अशी आपल्या उपरोधिक स्टाईलने विचारणा करीत थयथय़ाट केला. त्यानंतर आज त्यांच्याच हेलिकॉप्टरची तिसऱ्यांदा श्रीगोंदा हेलिपॅडवर तपासणी झाली.मात्र,त्यात काही आढळले नाही.त्यामुळे त्यांचीच नाही,तर इतरांचीही अशी ही तपासणी आता निव्वळ सोपस्कार झाला आहे.दरम्यान,आजच उद्धव ठाकरे यांचे पूत्र आदित्य यांच्याही हेलिकॉप्टरची तपासणी दापोलीत झाली.
या तपासणीत अजित पवारांच्या बॅगेत चकलीची पाकिटे, लाडवाचा डबा,तर रामदास आठवलेंच्या कागदी पिशवीत सुखी भेळ काल सापडली.त्यावरून या दोघांनीही कसलाही त्रागा न करता ही चेकिंग करणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांना सहकार्य केले. हेलिकॉप्टरची तपासणी केली,त्यानंतर आता अंगझडतीही घेणार का,अशी मिश्किल विचारणा आठवलेंनी आपल्या स्टाईलने तपासणी अधिकाऱ्यांना केली. त्यावर त्यांनी हसून नकार दिला.तर,निर्भय आणि मुक्त निव़़ड़णुकीसाठी असे उपाय आवश्यक असल्याचे अजित पवारांनी या तपासणीनंतर सांगितले.
पहिल्या अशा तपासणीनंतर उद्धव ठाकरेंनी मोठा त्रागा केला.आपल्या युरीन पॉटचीही ती का केली नाही,अशी उपरोधिक विचारणा त्यांनी ती करणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांना आपल्या स्टाईलने केली होती. तसेच सत्ताधाऱ्यांच्या हेलिकॉप्टरची व त्यातही मोदी-शाहांच्या ती का होत नाही,असा सवालही विचारला होता. त्यानंतर हेलिकॉप्टर तपासणीचा सिलसिला सुरु झाला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही ती झाली. त्यानंतर अजित पवार,आठवलेंची ती करण्यात आली.पण,त्यात काही मिळाले नाही.त्यातून हा केवळ सोपस्कार असल्याचे दिसून आले.दरम्यान,आज उद्धव ठाकरे यांच्या श्रीगोंदा येथील या तपासणीनंतर त्यांचे चिरंजीव आणि राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरेंच्या हेलिकॉप्टरची दापोलीत झा़डाझडती घेण्यात आली.पण,त्यातही काही मिळून आले नाही. दरम्यान,या तपासणी नंतरच्या उद्धव ठाकरेंच्या त्राग्यावर राज ठाकरेंनीच टोला हाणला.ज्यांच्या हातातून पैसे सुटत नाहीत,त्यांच्या बॅगेत ते कसे सापडणार,अशी विचारणा त्यांनी केली.तरीही त्यावरून त्यांचा रडूबाई शो सुरु आहे,असे ते म्हणाले.प्रचाराच्या राहिलेल्या चार दिवसांत मोदी,शाहांचे विमान तथा हेलिकॉप्टरचीही तपासणी केली गेली,तर आश्चर्य वाटणार नाही.