पिंपरीत लागले न सुटलेल्या समस्यांचे बॅनर्स,युती उमेदवार बनसोडेंची झाली मोठी गोची

आमदार अण्णा, तुमच्याकडे आहेत का,मतदारांच्या या प्रश्नांची उत्तरे?

उत्तम कुटे
पिंपरीःआघाडीतील राष्ट्रवादीचे पिंपरीतील आमदार आणि उमेदवार अण्णा बनसोडे यांच्याविषयी त्यांच्यात पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांची नाराजी होती.ते भेटत नसून पक्षाच्या बैठका, कार्यक्रमांना हजेरी लावत नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. तसेच ते आपल्या दोन टर्ममध्ये विधानसभेत मौनी राहिले आहेत.मतदारसंघात अनेक प्रश्न भेडसावत असून ते सोडवले नसल्याचाही त्यांच्यावर आरोप झालेला आहे.आता हेच प्रश्न त्यांना अनेक बॅनरमधून संपूर्ण पिंपरीत करण्यात आल्याने ऐन निवडणुकीत त्यांची मोठी अडचण झाली आहे.ते या फलकांवरील प्रश्नांना काय उत्तर देतात,याकडे पिंपरीच नाही,तर उद्योगनगरीचेही लक्ष लागले आहे.

आ. बनसोडेंविरुद्धच्या तक्रारींचा पाढा उमेदवारी देण्याच्या पिंपरीच्या पक्षाच्या आढावा बैठकीत बारामतीमध्ये खुद्द अजित पवारांसमोर वाचून त्यांना उमेदवारी न देण्याची मागणी काही पक्ष पदाधिकाऱ्यांनी केली होती.मात्र,कट्टर समर्थक असल्याने अजितदादांनी त्यांनाच पिंपरीतून पुन्हा उमेदवारी दिली.त्यातून हे फलक त्यांचे विरोधक नाही,तर पक्षांतर्गत नाराज गटाने,तर लावले नाहीत ना,अशी चर्चा सुरु झाली आहे.मात्र, त्यातून विचारण्यात आलेले प्रश्न खऱे असल्याने त्याची उत्तरे त्यांना द्यावीच लागणार आहे.नाही,तर हा प्रचाराचा मुद्दा बनून त्यांना तो अडचणीत आणू शकतो.

शहरातील भोसरी आणि चिंचवडपेक्षा पिंपरी अविकसित राहिलेला आहे.त्यातही तेथे झोपडपट्यांत गुन्हेगारी जास्त आहे.तेथे वाहतूक कोडींची त्यातही पिंपरी कॅम्पात मोठी समस्या आहे.त्याबाबत आ.बनसोडेंना सवाल करण्यात आला आहे.हे दोनच नाही,तर इतर अनेक प्रश्नही पिंपरीत आहेत.त्याकडे ना प्रशासनाचे लक्ष आहे ना आमदारांचे असा आरोप केला गेला आहे. त्यामुळे ते प्रश्न या होर्डिंग्जव्दारे उपस्थित केले गेले आहेत. एमआयडीसी बळकट करण्यासाठी तुम्ही काय केलं?, ट्राफिक समस्या सोडवण्यासाठी तुम्ही काय केलं?, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभेत किती लक्षवेधी मांडल्या?, मतदारसंघातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी तुम्ही काय केलं?, कोविड काळात नागरिकांसाठी तुम्ही काय केलं?, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तुम्ही काय केलं?अशी प्रश्नांची सरबत्ती दहा वर्षे पिंपरीचे आमदार राहिलेल्या बनसोडेंवर या बॅनर्समधून करण्यात आली आहे.त्यामुळे त्यातूनच नाही,तर समोर आघाडीचा सुशिक्षित चेहरा सुलक्षणा शिलवंत-धर असल्याने बनसोडेंची आमदारकीची वाट यावेळी बिकट झालेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *