एकही जागा न सुटल्याने कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला शहराध्यक्षांच्या राजीनाम्याचा ठराव;पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष कैलास कदम यांच्या राजीनाम्याची केली मागणी

पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष कैलास कदम यांच्या राजीनाम्याची केली मागणी

पिंपरीः पिंपरी-चिंचवडमधील तीनपैकी एकही जागा आघाडीत कॉंग्रेसला सुटली नाही. पक्षाचे शहराध्यक्ष डॉ.कैलास कदम यांच्यामुळे ती न मिळाल्याचा ठपका ठेवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारा ठराव शहरातील काही पक्ष पदाधिकाऱ्यांनी काल (ता.६) केली.त्यातून तोळामासा प्रकृती झालेल्या कॉंग्रेसमधील गटबाजी पुन्हा उफाळून आली पक्षात काहीच आलबेल नसल्याचेही त्यातून स्पष्ट झाले आहे.

पक्षबांधणी न झाल्याने (बूथरचना) कॉंग्रेसला एकही जागा मिळाली नसल्याचा ठराव २७ ऑक्टोबरच्या बैठकीत करण्यात आल्याची माहिती ही बैठक घेतलेले पक्षाचे वरिष्ठ शहर उपाध्यक्ष भरत वाल्हेकर यांनी काल दिली. कदम यांनी पक्षबांधणीच केली नसल्याचा आरोप त्यांनी केला.त्यामुळे त्यांना बदलून नवीन अध्यक्ष देण्याची मागणी प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्याकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले.ते अध्यक्ष राहिले,तर आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाला यश मिळणार नाही,असे ते म्हणाले.दरम्यान,वाल्हेकरांचे दावे,आरोप कदम यांनी फेटाळले.मूळात ही बैठक वाल्हेकरांना बोलावताच येत नसल्याचे ते म्हणाले.आघाडीतील तीन पक्षापैकी शिवसेनेची ताकद मुंबई व कोकणात जास्त असल्याने तेथे त्यांना जास्त जागा,पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी ताकदवान असल्याने तेथे ते मोठे भाऊ,तर विदर्भ आणि मराठवाड्यात कॉंग्रेस बलवान असल्याने तेथे पक्षाला जास्त जागा मिळाल्या,याकडे त्यांनी लक्ष वेधले.आपण खरे निष्ठावंत कॉंग्रेसी असून वाल्हेकर हे भाजपमधून पाच महिन्यांपूर्वी पक्षात आले असून ते व त्या बैठकीतील इतरांचे पक्ष उभारणीत शू्न्य योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.