दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा,तर लाभ नाही ना होणार ? युती आणि आघाडीच्या मतविभागणीचा फायदा युती बंडखोर भोईरांना?

युती आणि आघाडीच्या मतविभागणीचा फायदा युती बंडखोर भोईरांना?

उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःउद्योगनगरीतील तीनमधील चिंचवड या सर्वात मोठ्या मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे २१ उमेदवार रिंगणात आहेत. पण,तेथे खरी लढत ही युती,आघाडी आणि युतीचे बंडखोर अशा तिघांतच आहे. युती व आघाडी या दोघांच्या भांडणात तेथे युतीचे बंडखोर आणि सुसंस्कृत,सभ्य, सरळ, प्रामाणिक राजकारणी भाऊसाहेब भोईर या तिसऱ्याचाच लाभ,तर होणार नाही ना,अशी चर्चा आहे.हे तिन्ही उमेदवार मातब्बर असल्याने या बिग फाइटकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

चिंचवडच नाही,तर संपूर्ण शहरावर पकड असलेल्या जगताप कुटुंबातील शंकर जगताप हे युतीतील भाजपचे,तर तेथून तीनदा लढलेले वाकडचं बडं असलेले प्रस्थ राहूल कलाटे आघाडीतील राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत.या दोघांतच ही थेट लढत होणार होती. पण,आतापर्यंत आमदारकीसाठी अनेकदा डावलल्या गेलेल्या ज्येष्ठ नेते भोईरांनी अभी नही,तो कभी नही असा पवित्रा यावेळी घेत बंडाचे निशाण फडकावले. अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली.त्यातून ही लढत तिरंगी झाली.जगताप व कलाटे हे शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या पवना नदीच्या पलिकडचे,तर भोईर अलिकडचे उमेदवार आहेत. आतापर्यंतचे चिंचवडचे सर्व चारही आमदार नदी पलिकडील पिंपळे गुरव येथील एकाच कुटंबातील लक्ष्मण जगताप आणि त्यांच्या पत्नी अश्विनी हेच झालेले आहेत.त्यामुळे २०२४ ला नदीच्या अलिकडील आमदार होईल,अशी तेथील चिंचवडगाव व परिसरातील रहिवाशांची भावना आहे.ती त्यांचे एकगठ्ठा मतदान भोईरांना झाले अन भोईरांचे ज्येष्ठत्वपण, वादातीत चेहरा याजोडीने युती,आघाडीतील मतविभागणीचा त्यांना फायदा मिळाला,तर खरीही,होऊ शकते,मात्र,ते २३ तारखेलाच कळणार आहे.

चित्रपट कलावंत,निर्माते असलेल्या भोईरांचा उद्योगनगरीला सांस्कृत्रिक चेहरा देण्यात मोठा हातभार आहे.त्यांनी प्रथम १९९९ ला शहरात ७९ वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन भरवले. तर,यावर्षी ते शंभरावे भरवण्याचा मानही त्यांनी शहरालाच मिळवून दिला.आपल्या वाढदिवसानिमित्त आठवडाभर सांस्कृत्रिक कार्यक्रमांचे आयोजन करतात.दिवाळी पहाटसह असे साहित्य व कला क्षेत्राशी निगडीत उपक्रम ते वर्षभर घेत असतात.एकूणच सभ्य,सुसंस्कृत,प्रामाणिक साहित्यिक राजकारणी अशी त्यांची ओळख असून ती त्यांना यावेळी हात देण्याची शक्यता आहे.दुसरीकडे युतीतील राष्ट्रवादीचे दुसरे बंडखोर नाना काटे यांचे बंड शमले असले, तरी ते पूर्ण थंड झाले आहे की नाही,हे २३ च्या निकालातून स्पष्ट होणार आहे. तसेच युतीतील भाजप, राष्ट्रवादीत असलेले नाराज माजी नगरसेवकांचे दोन मोठे गट ही बाब भोईरांच्या पथ्यावर पडेल,असे दिसते.दुसरीकडे आघाडीचा उमेदवार हा आयात असून त्याचा प्रवेश न होताही त्याला राष्ट्रवादीचे तिकिट दिल्याने त्या पक्षातही मोठी नाराजी आहे. अशी दुहेरी नाराजी भोईरांना फायदेशीर ठरू शकतो.ती खरंच ठरते का हे निकालच सांगणार आहे.

चिंचवडला वंचित बहूजन आघाडीचा उमेदवार नाही. त्यांची हजारो दलित,मुस्लिम मते ही युती तथा भाजपचे उमेदवार जगताप यांना मिळणार नाहीत.तशीच ती आघाडीचे कलाटे यांच्याकडेही जाणार नाहीत.कारण त्यांची पार्श्वभूमी ही कट्टर शिवसैनिक अशी आहे.ती न सोडता तसेच प्रवेश न करताही राष्ट्रवादीने त्यांना लगेच उमेदवारी दिली हे हा वंचितचा मतदार विसरणार नाही. त्यामुळे ही मते अपक्ष भोईरांच्याच पारड्यात पडण्याची शक्यता आहे.