दिवाळी पाडव्याच्या दिवशी शास्त्रीय संगीत व भक्ती गीतांचे सादरीकरण
एम्पायर इस्टेट ज्येष्ठ नागरिक संघ चिंचवड स्टेशन येथे दिवाळी पाडव्याच्या दिवशी
“दिवाळी पहाट” कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
गायिका सौ.चेतना खळे-तवकर (इंदोर) यांनी शास्त्रीय संगीत व भक्ती गीते सादर केली.तसेच सिनेगायक श्री.निखिल वैद्य यांनी हिंदी/मराठी भावगीते सादर केली. वीतराग साउंड सिस्टीमचे राजेंद्र देसाई यांनी हिंदी गाणी सादर केली.
सर्व सभासदांनी या गाण्यांना उत्तम प्रतिसाद दिला.
अतिशय सुंदर,देखणा, श्रवणीय, अविस्मरणीय कार्यक्रमाचा आनंद घेतला.
संघाचे अध्यक्ष डॉ.रामदास माळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले व दिवाळी निमित्त सर्व सभासदांना शुभेच्छा दिल्या.

नोव्हेंबर महिन्यातील सभासदांचे वाढदिवस साजरे करण्यात आले.
दिवाळी निमित्त श्रीमती उमा पाटील यांनी संघास समई भेट दिली.
दिवाळी फराळ व चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसचिव श्री.जयकुमार नारकर यांनी केले.उपाध्यक्षा श्रीमती वंदनाताई काळे यांनी आभारप्रदर्शन केले.
सचिव ॲड.दिलीप पाटील, कार्याध्यक्ष संजय साळवी, कोषाध्यक्ष श्रीमती अर्चना नलावडे,उपकोषाध्यक्ष सुयश कुलकर्णी, फोटोग्राफी विजय भोंडोकर,सतीश पैठणकर,विनोद म्हाळसेकर, अशोकराव मोरे,यतीन पारेख,रामचरण राय, सौ.कविता ब्राह्मणगावकर, श्रीमती उमा पाटील यांच्या अथक परिश्रमाने हा सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला .

