मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनामुळे अरुण पवार यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज मागे

संभाजी ब्रिगेड ,छावा मराठा युवा संघ ,जिजाऊ ब्रिगेड ,छावा संघटना,
आणि आमची मेन कोर कमिटी
कुणाला पाठिंबा द्यायचा याबाबत लवकरच भूमिका घेणार

मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असल्याने चिंचवड विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अरुण पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, कुणाला पाठिंबा द्यायचा, याबाबत लवकरच भूमिका जाहीर करणार असल्याचे अरुण पवार यांनी सांगितले.
हजारो चिंचवडकराच्या साक्षीने सामाजिक कार्यकर्ते तथा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचे विश्वासू सहकारी व समर्थक अरुण पवार यांनी भव्य रॅली द्वारे शक्तीप्रदर्शन करीत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांना संभाजी ब्रिगेड, छावा मराठा युवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, छावा संघटनेचा अरुण पवार यांना पाठिंबा दिला होता.
आम्ही राजकारणात नवखे आहोत. उमेदवार उभा करुन तो पडला तर जातीची लाज जाईल. त्यामुळे आम्ही विधानसभा निवडणूक लढवायची नाही, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे माझी सगळ्या मराठा उमेदवारांना विनंती आहे की, सगळ्यांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत. निवडणूक हा काही आपला खानदानी धंदा नाही. एका जातीच्या जोरावर निवडणूक जिंकणे शक्य नाही. एका जातीवर पुढे जाणे शक्य नाही, हे एकमताने ठरवण्यात आले. त्यामुळे आपण निवडणूक लढायची नाही, असा निर्णय घेण्यात आला. फक्त उमेदवार पाडायचे, असे आमच्या बैठकीत ठरल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्याचे अरुण पवार यांनी सांगितले.
याची पिंपरी चिंचवड शहरातील मराठवाडा बंधू भगिनी, संभाजी ब्रिगेड, छावा मराठा युवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, छावा संघटनेचे हजारो कार्यकर्ते, जळगाव, खान्देश, रायगड, कोकण विभाग, आदिवासी समाज पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा मित्र परिवार यांची निराशा झाल्याने आपण दिलगिरी व्यक्त करीत आहोत. मात्र, सामाजिक चळवळ चालूच राहणार आहे. या माध्यमातून भेटत राहू, असेही अरुण पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *