उत्तम कुटे
पिंपरीः मावळ विधानसभा मतदारसंघात सध्या राजकीय वातारवण खूप गरम आहे.कारण तेथे युतीचे (राष्ट्रवादी)अधिकृत उमेदवार सुनील शेळके यांच्याविरुद्ध त्यांच्यात पक्षाचे बापूसाहेब भेगडे यांनी बंड करीत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.विशेष म्हणजे आघाडीने तेथे उमेदवार न देता भेगडेंनाच पाठिंबा दिला आहे.दुसरीकडे युतीतील भाजपनेही बंडखोरी
करीत शेळकेंऐवजी भेगडेंचा प्रचार सुरु केला आहे.या पार्श्वभूमीवर काल (ता.१) भाजप पदाधिकाऱ्यांची हत्याराने वार करीत आणि दगडाने ठेचून हत्या झाल्याने मावळ तालुका हादरून गेला.त्यामुळे कडू कुटुंबावर ऐन दिवाळीत दुखाचा डोंगरच कोसळला.
निलेश दत्ताञय कडु (वय (32, रा. सावंतवाडी, पोस्ट पवनानगर ता मावळ जि पुणे)असे मृताचे नाव आहे. तो भाजप विद्यार्थी आघाडीचा मावळ तालुका सरचिटणीस होता.लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर धुमाळ यांनी पैशाच्या उसनवारीतून ही घटना घडल्याचे आपला आवाजला सांगितले.त्याला गुन्ह्यातील फिर्यादी मृत निलेशचे चुलते लहू रामभाऊ कडू (वय ४९,सावंतवाडी,काले,पवनानगर,ता.मावळ) यांनीही दुजोरा दिला.आऱोपी सराईत गुन्हेगार अक्षय बाबु घायाळ वय 28 वर्षे,सावंतवाडी) हा फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.त्याचे साथीदार पियुश विश्वनाथ डोंगरे आणि साहिल साईनाथ जाधव (दोघेही रा. प्रभाचीवाडी ता. मावळ) हे ही या गुन्ह्यात आरोपी आहेत.
लहू कडू यांनी आपला आवाजला दिलेल्या माहितीनुसार निलेशने अक्षय़ला पिकअप घेण्यासाठी दोन लाख रुपये दिले होते.
त्या पैशाची मागणी तो करीत होता. त्यातून राग आल्याने अक्षयने आपल्या दोन साथीदारांसह निलेशचा विश्वासघाताने खून केला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत व आरोपी घटनास्थळी दारू पित होते.त्यावेळी अक्षय़ने प्रथम निलेशच्या डोक्यात हत्याराने घाव घातला.नंतर दगडाने ठेचून ठार मारले.सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय़) प्रशांत आवारे तपास करीत आहेत.