उत्तम कुटे,संपादक
पिंपरीः हडपसर पोलिस ठाण्यातील फौजदार (पीएसआय़) शरद दशऱथ कणसे याला पोलिस ठाण्यातच दहा हजार रुपयांची लाच घेताना गुरुवारी (ता.३१) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी)पकडले.यातून लाचखोरांचे धाडस वाढल्याचे दिसून आले.दिवाळीतच कणसे लाच घेताना पकडला गेल्याने हडपसर पोलिसांच्या इभ्रतीची चर्चा झाली.

कणसेने या प्रकरणातील तक्रारदाराकडे २५ हजाराची लाच मागून त्यातील पाच हजार घेतलेही होते. दहा हजाराचा दुसरा हफ्ता घेताना तो पकडला गेला.त्याबाबत तो ड्यूटीवर असलेल्या हडपसर पोलिस ठाण्यातच त्याच्याविरुद्ध लाचखोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला.या घटनेतील तक्रारदार व त्याच्या मुलाविरुद्ध कोलकत्ता येथील दंडाधिकारी न्यायालयाने वॉरंट जारी केले होते.त्यात या बापलेकांना अटक न करण्यासाठी कणसेने २५ हजाराची लाच मागून त्यातील पाच हजार घेतले.नंतर त्याने पुन्हा अटकेची भीती दाखवत बाकीच्या रकमेसाठी तगादा लावला.त्यामुळे तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली.त्यावरून पुणे एसीबीचे अधिक्षक शिरीष सरदेशपांडे,अप्पर पोलिस अधिक्षक डॉ.शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. पुढील तपास या युनीटचे पोलिस निरीक्षक (पीआय) अमोल भोसले करीत आहेत.

