पुणे जिल्ह्यात  १०९ उमेदवारांचे अर्ज बाद,सर्वाधिक ११ भोरचे,२१ जागांसाठी ५४८ जण रिंगणात

तीन सोनवणे उमेदवार असलेल्या जुन्नरला एकही अर्ज अवैध नाही,१७ चे १७ वैध

उत्तम कुटे : संपादक 
पिंपरीःविधानसभा उमेदवारांच्या अर्जांची छाननी बुधवारी (ता.३०) राज्यभर झाली. त्यात पुणे जिल्ह्यातील ७५७ पैकी तब्बल १०९ म्हणजे १४ टक्यांहून अधिक उमेदवारांचे अर्ज बाद झाले.६४८ रिंगणात राहिले.त्यात बहूतांश अपक्षा आहे.सर्वाधिक ११ अर्ज भोरमध्ये अवैध ठरले.तर, तीन सोनवणे आडनावाचे उमेदवार असलेल्या जुन्नर मतदारसंघातील एकही अर्ज अपात्र झाला नाही.तेथे १७ चे १७ पात्र ठरले.

mostbet

भोरमध्ये ३१ पैकी वीस उमेदवारांचे अर्ज वैध ठरले.म्हणजे ११ अपात्र निघाले.त्याखालोखाल मावळात ९,तर भोसरीत ८ अर्ज अपात्र झाले. इंदापूर आणि हडपसरमध्ये प्रत्येकी सर्वाधिक म्हणजे ४६ उमेदवार रिंगणात उरले.त्यानंतर बारामतीत ४२,तर पिंपरीत हा आकडा ४१ आहे.सर्वात कमी उमेदवार (१७) जु्न्नर आणि मावळमध्ये राहिले आहेत.

मतदारसंघ – बाद अर्ज -रिंगणातील उमेदवार
आंबेगाव – ५ – २६
खेड – ५ –  २९
शिरुर –   ६ –  ३६
चिंचवड – ५ –  ३९
पिंपरी – ४  – ४१
भोसरी –  ८  -२५

जुन्नरला तीन शरद सोनवणे,तर आंबेगावला दोन देवदत्त निकम

आंबेगाव विधानसभा मतदारसंघात आघाडीचे (राष्ट्रवादी) देवदत्त जयवंतराव निकम हे उमेदवार आहेत. तेथे भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टीकडून देवदत्त शिवाजीराव निकम हे दुसरे उमेदवार आहेत. आघाडीच्या उमेदवाराची मते खाण्यासाठी ही चाल खेळली गेल्याची चर्चा आहे.जुन्नरला तर तीन शरद सोनवणे उमेदवार असून तिन्ही अपक्ष आहेत.त्यातील शरददादा भिमाजी सोनवणे हे युतीतील शिंदे शिवसेनेचे बंडखोर,तर शरद बाबासाहेब सोनवणे आणि शरद शिवाजी सोनवणे हे दुसरे दोन अपक्ष आहेत.पिंपरीत कांबळे आडनावाचे आठ उमेदवार असून त्यात सात अपक्ष आहेत.शिरुरला तीन अशोक पवार उमेदवार असून त्यातील एक आघाडीतील राष्ट्रवादीचे,तर बाकीचे दोन्ही अपक्ष आहेत.